
बारामती तालुक्यात पाऊसाचा तडाखा
Sunday, March 1, 2020
Edit
बारामती - पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील काही भागात अवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिला आहे. राज्यातील अनेक ठिकाणी रब्बी हंगामातील पीकांची काढणी सुरू आहे. सर्वात मोठा फटका या शेतकऱ्यांना बसणार आहे. त्यामुळे अगोदरच विविध कारणांमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांवर निसर्ग नाराज झाल्याने शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडले आहे.
बारामती परिसरातील काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या सरी पडल्या तर काही ठिकाणी दमदार पाऊस झाला. कोणाच्या ध्यानीमनी नसताना भर उन्हाळ्यात अचानक पाऊस पडल्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. खळ्यात, मळ्यात उघडयावर असलेला कांदा भिजून खराब झाला असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच गहू पीक होता तोंडाशी आल्याने ते घरी न येताच पाऊसामुळे जाण्याची दाट शक्यता आहे.