विजेच्या कडकडाटासह बारामती तालुक्यात पावसाला सुरुवात
Wednesday, March 25, 2020
Edit
आधीच कोरोना व्हायरसचा विळखा अधिक घट्ट झाला असताना आणखी अवकाळी पावसाची भर पडली आहे. बारामती तालुक्यात अचानक आलेल्या या पावसाने वातावरणात बराच गारवा निर्माण केला. कोरोना व्हायरसला हे थंड वातावरण अनुकूल ठरु शकते, असं अनेक जाणकार सांगत आहेत. त्यामुळं थोडा धोका वाढण्याची शक्यता आहे. त्यातच पिकांचे होणारे नुकसानाने शेतकऱ्यांना दुहेरी झटका बसतो आहे.
सध्या राज्यात एकीकडे कोरोना संसर्गाने थैमान घातलं आहे. तर दुसरीकडे बेमोसमी पावसाने हजेरी लावल्याने कोरोनाच्या संसर्गात वाढ होण्याचा धोकाही वर्तवला जात आहे. या पावसाने ऐन काढणीला आलेलं शेतकऱ्याच्या हातातलं पिक वाया गेल्यानं शेतकरी चिंतेत आहे.