-->
पुणे विभागात 101 रुग्ण पॉझिटीव्ह -डॉ. दीपक म्हैसेकर

पुणे विभागात 101 रुग्ण पॉझिटीव्ह -डॉ. दीपक म्हैसेकर

पुणे : पुणे विभागात कोरोना सांसर्गिक रुग्णसंख्या 3 एप्रिल सायंकाळ अखेर 101  असून पुणे 57, पिंपरी चिंचवड 14, सातारा 3, सांगली 25 आणि कोल्हापूर 2 अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.


              डॉ. म्हैसेकर म्हणाले, तपासणीसाठी पाठविलेले एकूण नमुने 2018 होते. त्यापैकी 1878 नमुन्यांचे अहवाल प्राप्त झालेले असून 140 चे अहवाल प्रतिक्षेत आहे. प्राप्त अहवालापैकी 1777 नमुने निगेटीव्ह आहेत व 101 नमुने पॉझिटीव्ह आहेत. आतापर्यंत 18 रुग्णांना बरे झाल्यामूळे रुग्णालयामधून सोडण्यात आलेले आहे. 
विभागामधील 8178 प्रवाशापैकी 3996 प्रवाशांबाबत फ़ॉलोअप सुरू असून 4282 प्रवाशांबाबत पूर्ण झालेला आहे, आजपर्यंत 15,61,992 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत 72,87,291 व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 490 व्यक्तींना अधीक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले आहे.
         रुग्णालयाबाबत बोलतांना ते म्हणाले, पुणे विभागात एकूण 88 ठिकाणी क्वारंटाइन सुविधा निर्माण करण्यात आली असून या ठिकाणी एकूण 12 हजार 848 बेडस उपलब्ध आहेत तसेच 52 ठिकाणी आयसोलेशन सुविधा निर्माण करण्यात आली असून या ठिकाणी एकूण 2167 बेडस उपलब्ध आहेत, त्याप्रमाणे विभागात शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांचे रुग्णालयांकडे सद्यस्थितीत एकूण एन-95 मास्क 49 हजार 845 ट्रिपल लेअर मास्क 4 लाख 69 हजार 194 एवढे उपलब्ध आहेत. तसेच 3 हजार 781 पीपीई किट तसेच 12 हजार 944 सॅनीटायझर उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article