-->
संचारबंदीचे उल्लंघन केल्यामुळे वडगांव निंबाळकर पोलिसांकडून 7 जणांवर गुन्हे दाखल

संचारबंदीचे उल्लंघन केल्यामुळे वडगांव निंबाळकर पोलिसांकडून 7 जणांवर गुन्हे दाखल

कोऱ्हाळे बु- बारामती तालुक्यातील वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशनने काल 7 जणांवर संचारबंदीचे उल्लंघन केल्यामुळे त्यांच्यावर 188, 269, 270 तसेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कलम 52 (ब), महाराष्ट्र कोव्हीड 19 उपाययोजना नियम 2020 चे नियम 11 साथीचे रोग निबंधक कायदा कलम 2,3,4 प्रमाणे सचिन मुकेश अलबेरी रा. कन्नडवस्ती, वाघळवाडी, खन्ना रमेश गागडे रा. कन्नडवस्ती वाघळवाडी, विलास बाजीराव धायगुडे रा. धायगुडे वस्ती तरडोली, सचिन मुकेश अलगुरे रा. कन्नडवस्ती वाघळवाडी, दत्तात्रय छगन गाडेकर रा. चोपडज, विपुल मॅचिंद्र गाडेकर रा. चोपडज, गणेश अरविंद गाडेकर रा.चोपडज यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.


         हे सर्व आरोपी मानवी जिवीतास धोकादायक असलेल्या रोगाचा संसर्ग पसरवीण्याचा संभव असलेली हयीगयीची व घातकी कृती करीत असताना व मा.जिल्हा अधिकारी पुणे आपत्ती व्यवस्थापन शाखा यांचे कडील जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधीकरण जिल्हा अधिकारी कार्यालय पुणे क्र. जी.आ.व्य/कोरोना विषाणुन /156/2020 पुणे दि. 22/03/2020 रोजीच्या आदेशान्वये दिलेल्या रितसर आदेशाची अवेज्ञा करीत असताना मिळुन आलेने त्याचे विरुध्द  मजकुराचे दिले फिर्यादी वरुन गुन्हा रजिस्टरी दाखल करण्यात आला.
      विनाकारण घराबाहेर न पडण्याचे आवाहन


स्त्यावर विनाकारण फिरुन संचार बंदीचे उल्लंघन केल्याबद्दल वाघळवाडी , तरडोली , चोपडज  ई ठिकाणच्या लोकाना मारहाण न करता गुन्हे दाखल केले आहेत. 
        बारामती न्यायालयाने या अगोदर तीन तीन दिवस कैदे ची शिक्षा काहीना सुनावली आहे. अशा अटकेने भविष्यात चारीत्र्य पडताळणी,पासपोर्ट व पुन्हा एखादा गुन्हा दाखल झाला तर त्या व्यक्तीला Habitual offender म्हणून गृहित धरले जाईल. अशा प्रकारे त्या व्यक्तींचे मोठे नुकसान होवु शकते, घरीच रहा सुरक्षित रहा .स्वत:चे कुटुंबाचे व समाजाचे नुकसान करु नका असे वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशनचे एपीआय सोमनाथ लांडे यांच्याकडून सांगण्यात आले


Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article