-->
जिवनावश्यक वस्तुची वाहतुक करणाऱ्या ट्रक चालकाचे खुनासह दरोडयाचा गुन्हा उघडकीस आणून इतर ६ गुन्हे उघडकीस : पुणे ग्रामीण LCB शाखेची धाडसी कामगिरी

जिवनावश्यक वस्तुची वाहतुक करणाऱ्या ट्रक चालकाचे खुनासह दरोडयाचा गुन्हा उघडकीस आणून इतर ६ गुन्हे उघडकीस : पुणे ग्रामीण LCB शाखेची धाडसी कामगिरी

 


       दि.३०/३/२०२० रोजी रात्री ०१.२० वा.चे सुमारास मौजे मळद ता.दौंड जि.पुणे गावचे हद्दीत रेल्वे उड्डाणपुलाजवळ सोलापुर-पुणे हायवे रोडलगत ट्रक नं एमएच-२५ यु ४२०१ वरील चालक काशिनाथ रामभाऊ कदम वय ५५ वर्षे रा.ढोकी ता.कळंब जि.उस्मानाबाद हे ट्रक रोडचे कडेला लावून लघवीसाठी गेले असता लघवी करुन परत येत असताना सब रोडने पायी येणारे पाच ते सहा अनोळखी इसमांनी त्यांचे छातीवर चाकूने वार करुन त्याचे जवळील रोख रक्कम तीन हजार रुपये, ड्रायव्हींग लायसन्स, एक पांढरे रंगाचा मोबाईल तसेच त्याचे अगोदर त्याच ठीकाणी थांबलेला टेम्पो नं एमएच-१२ एचडी १३११ वरील क्लीनर महंमद मेहबुब पठाण वय ४९ वर्षे रा.उस्मानाबाद याचे खिशातील सँमसंग कंपचा मोबाईल व त्याच वाहनावरील ड्रायव्हर अल्ताफ खैयुम पटेल याचे खिशातील रोख २०००/- रुपये, ड्रायव्हींग लायसन्स व पाकीट असा एकुण किमत रु ७०००/- रु. चा माल जबरीने चोरुन नेला. सदर घटनेत ट्रक ड्रायव्हर काशिनाथ रामभाऊ कदम वय ५५ वर्षे रा.ढोकी ता.कळंब जि.उस्मानाबाद यांना औषधोपचारास घेवुन जात असताना ते मयत झाले व टेम्पो क्लीनर महंमद मेहबुब पठाण हे जखमी आहेत. सदरबाबत ट्रकचा क्लीनर शकील आयुब शेख वय ३५ रा.कसबे तडवळा ता.जि. उस्मानाबाद यांनी दिले फिर्यादीवरून दौंड पो.स्टे. गु.र.नं.१४९/ २०२० भादंवि क.३९५, ३९६, ३९७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. गुन्हा करताना आरोपींनी कोणताही पुरावा मागे न ठेवल्याने गुन्हा उघडकीस आणणे हे पोलीसांसमोर मोठे आव्हान होते.


     सदर आव्हानात्मक गुन्हयाचा कौशल्यपूर्ण तपास LCB शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली LCB टिमने करून गोपनीय बातमीदारामार्फत  माहिती काढून आरोपी निष्पन्न करून दौंड पो.स्टे. डी.बी.पथकाची मदत घेवून आरोपी नामे - 
*१) गणेश अजिनाथ चव्हाण वय २२ वर्षे रा.बोरावकेनगर, दौंड ता.दौंड जि.पुणे.*
*२) समीर उर्फ सुरज किरण भोसले वय १९ वर्षे रा . गोपाळवाडी-पाटस रोड, दौंड ता.दौंड जि.पुणे* 
       या दोघांना गोपाळवाड-पाटस रोड, दौंड येथे सापळा रचून सुमारे २ कि.मी. पाठलाग करून ताब्यात घेतलेले आहे. 
       त्यांचेकडे सदर गुन्हयाचे अनुषंगाने चौकशी केली असता त्यांनी त्यांचे इतर साथीदार यांचेसह दोन दिवसापूर्वी सोलापूर रोडला मळद येथे पुलाजवळ थांबलेल्या ट्रकचालकास चाकूने भोकसून त्याचेकडील पैसे व मोबाईल लुटुन त्याचे पाठीमागे थांबलेल्या टेम्पोची काच फोडून त्यांचेकडील मोबाईल पैसे लुटल्याचे सांगितले. तसेच त्याचे आदल्या दिवशी खडकी येथे एका कार्यालयासमोर थांबलेल्या छोटा हत्ती टेम्पोमधील एकाचे डोक्यावर चाकूने मारुन पैसे, मोबाईल, बॅगा व महिलांचे दागिने लूटल्याचे सांगून ८ दिवसापूर्वी वरवंड येथील एका हॉटेलसमोरुन मोटरसायकलची चोरी करुन हॉटेलमागे असलेल्या एमएसईबी पॉवरहाऊस येथील वॉचमनला गजाने डोक्यात मारहाण करुन मोबाईल व पैसे लुटल्याचे सांगितले. १० दिवसापूर्वी लिंगाळी येथून एक पॅशन प्रो मोटरसायकल चोरल्याचे सांगितले. तसेच सुमारे १५ दिवसापूर्वी स्वामीचिंचोली येथे एका हॉटेलसमोर लघवीसाठी थांबलेल्या दोघांपैकी एकास कुऱ्हाडीने मारहाण करून चाकूचा धाक दाखवून त्यांचेकडील मोबाईल व पैसे लुटल्याचे सांगितले आहे. 


    सदरबाबत पोलीस स्टेशनकडील रेकॉर्डची पडताळणी केली असता *खालीलप्रमाणे गुन्हे उघडकीस आलेले आहेत.* 
*१) दौंड पो.स्टे. गु.र.नं.१४९/ २०२० भादंवि क. ३९५, ३९६, ३९७*
*२) दौंड पो.स्टे. गु.र.नं.१४८/२०२० भादंवि क. ३९७* 
*३) दौंड पो.स्टे. गु.र.नं.१४७/२०२० भादंवि क. ३७९*
*४)यवत पो.स्टे. गु.र.नं.२४७/२०२० भादंवि क. ३९४, ३३३, ३५३* 
*५)यवत पो.स्टे. गु.र.नं.२४८/२०२० भादंवि क. ३७९* 
*६) दौंड पो.स्टे. गु.र.नं.१३३/ २०२० भादंवि क. ३९४, ३०७, ५०४, ३४*
 
       यातील आरोपी *गणेश अजिनाथ चव्हाण हा शिक्रापूर पो.स्टे. गु.र.नं.६७५/१९ भादंवि क.३९२, ३४ व दौंड पो.स्टे. गु.र.नं.४८८/१८ भादंवि क.३९४* या दोन गुन्हयांमध्ये पाहिजे आरोपी आहे.


     सदर दोन्ही आरोपी यांची वैदयकिय तपासणी करुन त्यांना दौंड पो.स्टे. चे ताब्यात दिलेले आहे. 


      सदर कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.पद्माकर घनवट सो. यांचे मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड, पोहवा. अनिल काळे, रवि कोकरे, महेश गायकवाड, निलेश कदम, सचिन गायकवाड, पो.ना.सुभाष राऊत, गुरु गायकवाड, ज्ञानेश्वर क्षिरसागर,चा.पोहवा. काशिनाथ राजापुरे, दौंड पो.स्टे. चे पोहवा. असिफ शेख, सुरज गुंजाळ, श्रीगोंदा पो.स्टे.चे पोहवा. अंकुश ढवळे यांनी केलेली आहे.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article