-->
वडगांव निंबाळकर पोलिसांची ड्रोनद्वारे करडी नजर; संचारबंदीचे उल्लंघन केल्यास कारवाई

वडगांव निंबाळकर पोलिसांची ड्रोनद्वारे करडी नजर; संचारबंदीचे उल्लंघन केल्यास कारवाई

बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर या पोलिस स्टेशनच्या अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये करोना रोगाची संसर्गाची परवा न करता आणि संचारबंदी न जुमानता अनेक लोक रस्त्यावरती विनाकारण फिरत आहेत .अशा विनाकारण फिरणाऱ्या व्यक्तींवर १ एप्रिलपासून वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यांतर्गत ड्रोनद्वारे नजर ठेवण्यास सुरुवात केली आहे अनेकांवरती गुन्हे दाखल करण्यास सुरुवात झाली आहे  .वाघळवाडी सोमेश्वरनगर, करंजेपूल , वडगाव निंबाळकर, को-हाळे आदी गावांवर ड्रोनची करडी नजर राहणार आहे .



प्रशासनाला लोकांना पकडता पकडता आणि समजून सांगता सांगता प्रशासनाची चांगलीच दमछाक होत आहे .त्यामुळे घरात संचारबंदीत विनाकारण घराबाहेर पाडणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी ड्रोनची मदत पोलीस प्रशासनाला घ्यावी लागली आहे .पुणे जिल्हा अधीक्षक संदीप पाटील यांनी दिलेल्या आदेशानुसार प्रशासनाने वडगाव निंबाळकर ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली वडगाव निंबाळकर ठाण्याअंतर्गत येणाऱ्या गावांवर ड्रोनद्वारे  आता करडी नजर राहणार आहे .



ग्रामीण भागातील विनाकारण फिरणाऱ्यांवर ड्रोनद्वारे आता नजर ठेवली जाणार आहे विनाकारण बाहेर पडणाऱ्या लोकांवरती या ड्रोनच्या नजर राहणारा असून या चित्रीकरणाचा  गुन्हा दाखल करण्यासाठी उपयोग केला जाणारा आहे  त्या व्यक्तीवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे .त्यामुळे सर्वसामान्य जनतेला आमचे आव्हान आहे की विनाकारण घराबाहेर पडू नका घरात रहा सुरक्षित रहा .वडगाव निंबाळकर चे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांनी सांगितले आहे.


Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article