गोरगरीब जनता उपाशी मात्र तेल साखर कडधान्य विकणारे तुपाशी; अजित दादा पवारांकडे तक्रार करणार - साधू बल्लाळ
बारामतीमध्ये किराणा दुकानांमध्ये अनेक ठिकाणी अधिकचे पैसे घेऊन सर्व सामान्य जनतेची लूट चालू आहे, त्यामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहे याच पार्श्वभूमीवर आता पोलीस खात्याची संपूर्ण ठिकाणी कडी नजर असल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. उभ्या महाराष्ट्रावर खूप मोठे संकट आले आहे या संकटाला सामोरे जाण्यासाठी आता बारामतीकरांनी सज्ज झाले पाहिजे किराणा दुकानांमध्ये अनेकदा खरेदी करत असताना जास्तीच्या दराचे भाव लावुन लोकांची लूट केली जात आहे.
परंतु आता याच किराणा दुकांदारावर गुन्हे दाखल का होत नाही ? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेसमोर उभा राहिला आहे
नुकताच बारामतीमध्ये कोरोणाचा एक पेशंट सापडल्यामुळे बारामतीत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे,परंतु बारामतीकर है कुठल्याही संकटाला हार न मानता सामोरे जात असतात त्याच पार्श्वभूमीवर आता बारामतीकरांनी घराबाहेर न पडता आपण या हद्दपार केल्याशिवाय स्वस्थ बसायचं नाही असा संकल्प करू या बारामतीमध्ये काही ठिकाणी गोरगरीब जनता यांचे हाल होत आहेत परंतु याच गोरगरीबांचे खाणे मुश्किल झाले आहे त्यामुळे काही उद्योजकांनी या गोरगरिबाला मदत करण्यासाठी पुढे यावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सामाजिक न्याय विभागाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष साधू बल्लाळ केले आहे.
सदरील बारामतीतील काही किराणा दुकानांमध्ये जास्तीचे दर लावून गिर्हाईकांना व सर्वसामान्यांना फसवणाऱ्या दुकानदारावर गुन्हे दाखल करण्यासाठी संबंधित ग्राहकाने कायदेशीर मार्गाने पोलीस स्टेशन यांना कळवून संबंधितांवर कठोरात कठोर कारवाई करण्यासाठी पुढे यावे असे आवाहन देखील साधू बल्लाळ यांनी केले.
तसेच आपण बारामतीकर आहोत याचे भान ठेवून आपण आपल्याच माणसांची फसवणूक करतो का ? हा प्रश्न आपल्या मनामध्ये आणावा व जर कोणी असं करत असेल तर त्याला सोडलं जाणार नाही याची दखल देखील संबंधित जास्तीचे भाव घेणाऱ्या किराणा दुकानदाराने लक्षात घयावे असा दम किराणा दुकानदारांना भरला आहेगोरगरीब जनता उपाशी मात्र तेल साखर कडधान्य विकणारे तुपाशी. देशात व राज्यात कोरणा-या विषाणूचा कार्डाला आहे मात्र तेल साखर आणि कडधान्य विक नारे यांनी मात्र गोरगरिबांची लूट करत आहेत होलसेल दुकानदाराकडे गेल्यानंतर साखर कडधान्य तेल यामध्ये खूप मोठी तफावत दिसून येत आहे व नागरिकांमध्ये बोलले जात आहे तेल पावशेर चाळीस रुपये विकले जाते म्हणजेच 160 रुपये किलो विकले जाते तर कडधान्य चढ्या भावाने सर्वसामान्यांची लूट सुरू आहे लवकरच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्याकडे तक्रार करणार असल्याचेही साधु बल्लाळ यांनी सांगितले आहे सरकार एका बाजूने सर्वसामान्य गोरगरीब आला मदत करते तर दुसऱ्या बाजूने मात्र कडधान्याचे भाव तेल व साखर हेही भाव वाढवून सर्व सामान्य जनतेची लूट चालू आहे याकडे शासन लक्ष देणार आहे का असा प्रश्न सर्वसामान्य जनतेसमोर पडलाय आहे एका बाजुने डॉक्टर पोलिस खाते आपले कुटुंब सोडून जनतेच्या सेवेसाठी रात्रंदिवस काम करत आहे मात्र काही दुकानदार गोरगरीब जास्तीचे पैसे घेऊन उघडउघड फसवणूक करत असल्याने सर्वसामान्य गोरगरीब जनतेवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी सर्वसामान्य गोरगरीब पीडीत या लोकांसाठी मोफत धान्य देऊन सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्याचे काम केले आहे परंतु किराणा दुकानांमध्ये तेल साखर आणि कडधान्य या वस्तूमध्ये आवजी भाऊ लावून सर्वसामान्यांची लूट होत असल्याने संबंधित आशा किराणा व होलसेल दार दुकानावर गुन्हे दाखल होऊन यांच्यावर मोक्कांतर्गत कारवाई करावी अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्याकडे साधू बंद करणार असल्याचे हे त्यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले चौकट विशेषता काही छुप्या पद्धतीने गोवा चाळीस रुपये तर तंबाखू पुडी वीस रुपये प्रमाणे विकण्याचा धंदा आता चालू असल्याचे बोलले जात आहे संबंधित महा विकास आघाडीने गुटखाबंदी करूनही काही छुप्या पद्धतीने गोवा तंबाखू विकत आहेत यांच्यावर देखील मोक्कांतर्गत कारवाई करावी अशी मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे करणार आहे