पोलीस व आरोग्य कर्मचाऱ्यांना पत्रकार संघाद्वारे सॅनिटायझर वाटप
बारामती तालुका ग्रामीण पत्रकार संघाद्वारे वडगाव निंबाळकर पोलीस, आरोग्य कर्मचारी, ऊसतोड कामगार, पेट्रोल पंप कामगार ई.ना एक एक लिटर शुद्ध सॅनिटायझरच्या बाटल्यांचे वाटप करुन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केल्या जाणाऱ्या त्यांच्या सेवेचे कौतुक करण्यात आले.
पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश जगताप, सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र यादव, वडगाव निंबाळकरचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडेसाहेब, पोलीस हवालदार महेंद्र फणसे, जाधव, आरोग्य कर्मचारी परवेझ मुलाणी, पेट्रोल पंप कामगार, ऊसतोड कामगार यांसह अनेकाना यावेळी प्रत्येकी एक लिटर शुद्ध सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.
प्रास्ताविक पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष गणेश आळंदीकर यानी केले. स्वागत पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश जगताप यानी केले. यावेळी वडगाव निंबाळकरचे स.पो.नि.सोमनाथ लांडे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अटक सत्र चालु असुन आत्तापर्यंत १० जणाना अटक केली आहे. सर्वांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असल्याचे सांगुन जनतेने प्रशासनास सहकार्य करुन संचारबंदीचे नियम पाळावेत विनाकारण बाहेर पडु नये असे आवाहन केले. कार्यकारी संचालक यादव यांनी ऊसतोड कामगारांना अनुदान व किराणा उपलब्ध केले असल्याचे सांगितले. यावेळी पत्रकार दत्ता माळशिकारे, चिंतामणी क्षीरसागर, युवराज खोमणे, तुषार धुमाळ, विनोद गोलांडे ई. मान्यवर हजर होते. आभार हेमंत गडकरी यांनी मानले.