वडगांव त्या कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कातील 12 पैकी 9 जण निगेटिव्ह
Thursday, May 21, 2020
Edit
वडगांव येथील कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कातील बारा व्यक्तींपैकी नऊ व्यक्तीचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून तीन लोकांचे तपासणी रिपोर्ट येणे बाकी असल्याची माहिती बारामती आरोग्य विभागाने दिली.
तालुक्यातील वडगाव निंबाळकर गावात कोरोनाचा 12 वा रुग्ण आढळला होता. तो मालाडवरुन गावी आला होता. आपल्या मुलीला भेटावयास आलेली व्यक्ती ही कोरोना बाधित असल्याचे पुढे आले आहे. त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने त्याच्या संपर्कातील १२ लोकांची तपासणी करण्यात आली होती. त्यातील ९ लोकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. तर 3 लोकांचे रिपोर्ट येणे बाकी आहे. अशी माहिती बारामती तालुका आरोग्य अधिकारी डॉ मनोज खोमणे यांनी दिली.