बारामती तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या 12, वडगांव मध्ये मुंबई वरून आलेली महिला पॉझिटिव्ह
Tuesday, May 19, 2020
Edit
पुणे : बारामती तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या बारावर पोहोचली आहे. तालुक्यातील वडगाव निंबाळकर गावात हा रुग्ण आढळून आल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
बारामती तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या बारावर पोहोचली आहे. तालुक्यातील वडगाव निंबाळकर गावात हा रुग्ण आढळला आहे. तो मालाडवरुन गावी आला होता. आपल्या मुलीला भेटावयास आलेली व्यक्ती ही कोरोना बाधित असल्याचे पुढे आले आहे. एक दिवस या रुग्णाने बारामतीतील वडगाव निंबाळकर या गावात मुक्काम केल्याचीही माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. खोमणे यांनी दिली. आतापर्यंत बारामती तालुक्यात सहा रुग्ण बरे झालेत , आता चौघांवर उपचार सुरु आहेत तर दोघांचा मृत्यू झाला आहे.