-->
बारामती; मुर्टी गावातील त्या व्यक्तीच्या मुलालाही कोरोना, एकूण संख्या 13 वर

बारामती; मुर्टी गावातील त्या व्यक्तीच्या मुलालाही कोरोना, एकूण संख्या 13 वर

बारामती : मुंबईहून बारामती तालुक्यातील मूर्टी येथे आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाली होती. आज त्याच्या मुलालाही कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल आला आहे, त्यामुळे बारामती तालुक्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 12 वर पोचली आहे.
या पार्श्वभूमीवर मूर्टीसह आजूबाजूचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला असून ग्रामस्थांनी नाहक घराबाहेर न पडता काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.


बारामती तालुक्यातील मूर्टी येथे एक व्यक्ती मुंबईवरुन वास्तव्यास आली होती. या व्यक्तीला सर्दी, खोकल्याचा त्रास जाणवल्याने त्याने गावातच तपासणी केली. मात्र निदान झाले नाही. त्यानंतर ही व्यक्ती मोरगाव येथे गेल्यानंतर त्याचा संशय आल्याने त्याची तपासणी करण्यात आली. तेव्हा त्यास कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यावरून आरोग्य खात्याने त्याच्या निकटच्या संपर्कातील नातेवाईकांचे घशातील द्रवाचे नमुने तपासणीसाठी पाठवले होते. आज त्या रुग्णाच्या मुलाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य खाते सतर्क झाले आहे.
बारामती तालुक्याच्या ग्रामीण भागातील हा सहावा, तर एकूण संख्येत हा बारावा रुग्ण आहे. या पार्श्वभूमीवर मूर्टीसह आजूबाजूचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी घराबाहेर न पडता अधिकाधिक दक्षता घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article