
मार्केट कमिटीचे थोड्याच दिवसात 2 पेट्रोल पंप कार्यान्वित
बारामती तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे 2 पेट्रोल पंप थोड्याच दिवसात कार्यान्वित होणार असल्याची माहिती सभापती अनिल खलाटे व सचिव अरविंद जगताप यांनी दिली. देशात कोरोना व्हायरसने थैमान घाल्याने 2 महिने लॉकडाउन आहे लॉकडाउन काळात सर्व काही बंद असल्याने मार्केट कमिटीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मार्केट कमिटीचे आर्थिक source वाढण्यासाठी शेतकऱ्यांच्या हितासाठी मार्केट कमेटीला 2 पेट्रोल पंप मंजूर झाले आहेत. सुपे येथे मार्केट कमिटीच्या जागेत हिंदुस्थान पेट्रोल पंपाचे काम प्रगती पथावर आहे तर बारामती मार्केट च्या आवारात cng गॅस पंपाचे काम झाले असून थोड्याच दिवसात दोन्ही पंप सुरू होतील. तसेच शेतकऱ्यांच्या कांदा पिकाला हमीभाव मिळण्यासाठी केंद्र सरकारने नाफेड च्या माध्यमातून कांदा खरेदी सुरू करण्याचा प्रस्ताव दिला असल्याचे खलाटे यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मार्केट कमेटीला अचानक भेट दिली असता लॉकडाउन काळात व्यापारी, शेतकरी, आडते, मार्केट कमिटीचे पदाधिकारी सोशल डिस्टन्सिंगचे योग्य रित्या पालन करतात का व कोरोना पासून सावध राहण्याच्या सूचना केल्या.