बारामती ; 29 वर्षीय पुरुषास कोरोनाची लागण
बारामती : आज दिनांक 26/05/2020 रोजी कोरोनाबाबत बारामती तालुक्याची अपडेट्स खालील प्रमाणे आहेत. नगर परिषद बारामतीमध्ये दुध संघ वसाहत येथील एका रुग्णाची (वय 29 वर्षे पुरुष ) चाचणी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. सदरची व्यक्तीची खाजगी हॉस्पिटलमध्ये स्लॅब घेऊन चाचणी घेतली असता पॉझिटीव्ह आली आहे.त्यामुळे दुध संघ वसाहतची सीमा गृहीत धरुन प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व सेवा व वाहतुकीस बंदी घालण्यात येत आहे.तरी सर्व नगर परिषद बारामती येथील नागरिकांना आवाहान करण्यात येत आहे की आपण आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी लाॅकडॉऊन शिथिलतेचा गैरफायदा घेऊन कुठल्याही परिस्थितीमध्ये घराच्या बाहेर पडू नये. गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये. अत्यावश्यक व गरजेच्या कामासाठी बाहेर पडताना मास्कचा वापर करणे, सामाजिक अंतर ठेवणे व त्याने सॅनिटाझरचा वापर करणे अत्यंत गरजेचे आहे. प्रशासकीय यंत्रणेस सर्वे कामी व कायदा व सुव्यवस्था कामे सहकार्य करावे असे आवाहन दादासाहेब कांबळे प्रांताधिकारी बारामती यांनी केले आहे.