-->
जिल्ह्यातील ४६ गावे ही प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर, बारामती तालुक्यातील 3 गावांचा समावेश

जिल्ह्यातील ४६ गावे ही प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर, बारामती तालुक्यातील 3 गावांचा समावेश

जिल्ह्यातील ४६ गावे ही प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर


 पुणे जिल्ह्यातील करोना बाधित रुग्णांची वाढती संख्या विचारात घेऊन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी जिल्ह्यातील ११ तालुक्यांमधील ४६ गावे ही प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केली आहेत. त्यामध्ये सर्वाधिक १६ गावेही ही हवेली तालुक्यातील आहेत. प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये बारामतीतील माळेगाव बुद्रुक,कटफळ, वडगांव निंबाळकर या गावांचा समावेश आहे.



इंदापूर तालुक्यातील शिरसोडी हे गाव आहे.


  हवेली तालुक्यामध्ये मांजरी खुर्द गावठाण, मांजरी बुदुक झेड कॉर्नर, महादेवनगर, शिवजन्य सोसायटी, भंडलकरनगर, कदमवाकवस्ती-स्वामी विवेकानंद-कवडी माळवाडी , लोणीकाळभोर-गावठाण, फुरसुंगी-हांडेवाडी, फुरसुंगी -पिसोळी-अंतुलेनगर, वाघोली- केसनंद-जोगेश्वरीरोड-सदगुरुपार्क, पेरणे-लोणीकंद गावठाण, वाघोली-फुलमळा, गाडेवस्ती, आव्हाळवाडी रोडवरील गणेशनगर, गणेशपार्क काबडेवाडी, बकोरी-प्रिस्टीनसिटी फेज-१, किरकटवाडी-कोल्हेवाडी(किरकटवाडी), कोल्हेवाडी(खडकवासला), जे.पी.नगर गोसावी वस्ती (नांदेड), कोंढवे धावडे-ग्रीन कंट्री सोसायटी परिसर, नऱ्हे गोकुळनगर, नवदीप सोसायटी ते देवर्षी कॉम्प्लेक्स, कंजारवस्ती, कृष्णाईनगर, भिलारवाडी जांभुळवाडी-गावठाण, ऊरुळीकांचन-आश्रमरोड खानापुर हा परिसर आहे. याशिवाय शिरूर, वेल्हा दौंड, खेड आणि पुरंदर या तालुक्यातील गावे आहेत.


Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article