गुळुंचे ; लग्नघरातील व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह
निरा : लग्नघरातील व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचा अहवाल येऊनही मायणी (जि.) येथून आज वऱ्हाडी मंडळी सगळ्यांचे जीव धोक्यात घालून गुळुंचे येथे विवाहासाठी आली. मात्र, संबंधित जिल्ह्याच्या प्रशासनाने पुणे जिल्हा प्रशासनाला ही माहिती तातडीने कळविली. मात्र, दोन्ही बाजूंच्या लोकांनी शक्कल लढवत शासकीय ताफा चौकशी साठी पोचण्याचा आताच सकाळी साडेदहालाच विवाह आटोपला. या बातमी ने संबंध जिल्ह्यात तसेच तालुक्यात खळबळ उडाली असून संबंधित कोरोनाबाधित व्यक्ती वऱ्हाडी मंडळींच्या संपर्कात आली असल्याने आता दोन्ही पक्षांकडे कोरोना संशयित रुग्ण सापडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
आज सकाळी सहा वाजता खटाव मायणी हुन व-हाड निघाल पाडेगाव टोलनाका साडेसात वाजता ओलांडला. मायणीतील प्रशासनाला समजलं एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह झाला आहे आणि त्यांच्या घरात लग्न आज आहे. फोनाफोनी करून सातारा आणि पुणे जिल्हा प्रशासन सजग झाले. लग्नाला आलेल्या व-हाडी मंडळींना पुरंदरच्या प्रशासनाने नवरदेव सोडून माघारी जाण्याची विनंती केली. आणि सोशल डिस्टंसींग पाळत साडेबाराच्या मुहूर्ताच लग्न साडेदहा वाजताच लागलं.
कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर विवाह सोहळ्याला पन्नास माणसात लग्न लावण्याची परवानगी प्रशासनाने दिली. आज नीरा नजिकच्या एका मोठ्या व प्रतीष्ठीत गावात एक प्रतीष्ठीत कुटुंबातील विवाह सोहळा होता. वास्तविक हा विवाह सोहळा ३० मे रोजी होणार होता पण तो आज १९ रोजी घेण्यात आला. मायणी येथिल देशमुख परिवारातील वर व पुरंदर तालुक्यातील निगडे-देशमुख परिवारातील वधु यांचा विवाह थोडक्या लोकांत छोटखानी कार्यक्रम नियोजित होता. मायणी येथुन व-हाड पहाटे सहा वाजता निघाले. सात वाजता वराच्या कुटुंबातील सदस्य कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल आला. ती व्यक्ती व-हाडात नव्हती पण ते मागील काही दिवसांपासून या व-हाड्यांच्या संपर्कात होते. सातारा जिल्हा प्रशासनाने तडकाफडकी निर्णय घेत पुणे जिल्हा प्रशासनाला संबंधित विवाह सोहळा ठिकाणी जाऊन खबरदारी घेण्याच्या सुचना दिल्या.
मोठ्या घरातील विवाह सोहळा म्हटलं की कितीही टाळलं तरी लोक येणार अस गृहित धरुन काळजी घेतली जात होती. पण अचानक प्रशासनाचे अधिकारी दिसल्याने दोन्ही बाजुच्या लोकांनी श्र्वास रोखले काय झालं हे कोणालाच कळेना. व-हाडातील लोकांना कोरांटाईन करण्यासाठी पुन्हा मुळ गावी पाठवण्यात आले. नवरदेव आणि मोजकेच लोकांत साडेबाराच्या मुहूर्ताच लग्न साडेदहा वाजता सोशल डिस्टंसींग पाळत झाले.
आता प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचाऱी याठिकाणी पोहोचले आहेत. प्रत्येकाची प्राथमिक तपासणी करण्यात येत आहे. अगदी नववधी आणि नवरदे सुद्धा. आरोग्य कर्मचाऱ्यांनी सुचनेनुसार होम कॉर्नाईंनचे शिक्के हातवर मरणार तोच एका बड्या अधिकाऱ्याचा फोन प्रशासनाला आल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांनी तेथुन काढता पाय घेतला आहे. या सर्व घटनांची खरमरीत चर्चा परिसरात केली जात आहे.