कोरोनाचे बारामतीमध्येच होणार निदान, पुण्याला जाण्याची आवश्यकता नाही
बारामती शहरातील कोविड-१९ चाचणीला केंद्र शासनाने मान्यता दिली आहे.त्यानुसारबारामती शहरात वैद्यकीय महाविद्यालयात उभारलेली प्रयोगशाळा उद्यापासुन ( गुरुवार 28 मे 2020) होणार कार्यान्वित होणार आहे.याबाबत वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. संजीवकुमार तांबे यांनी माहिती दिली. प्रयोगशाळेला मान्यता मिळाल्याने आता कोविड १९ चे बारामतीमध्येच निदान होणार आहे.कोरोना रुग्णांच्या वाढत्या पार्श्वभुमीवर राज्यात बारामतीसह सहा ठिकाणी कोविड-१९ तपासणीसाठी विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळा (व्हीआरडीएल)सुरु करण्यास राज्य शासनाने १६ एप्रिल रोजी मान्यता दिली. त्यानुसार आता शहरातील कोरोना संशयिताच्या तपासणीसाठी शहरातील वैद्यकीय महाविद्यालयात प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे.या प्रयोगशाळेची नागपुर येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थानच्या सुक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या डॉ. मिना मिश्रा यांनी पाहणी केली होती.या पाहणीनंतर मिश्रा यांनी या प्रयोगशाळेत कोविड १९ च्या तपासणीसाठी आवश्यक योग्य सुविधा असल्याचा अहवाल दिला आहे.तसेच बारामतीत कोविड-१९ चाचणी केंद्र शासनाने मान्यता दिल्याचे कळविले आहे.त्यामुळे बारामती शहरात एमआयडीसी येथे वैद्यकीय महाविद्यालय येथे कामकाज सुरू होणार आहे.यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार ,वैदकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख,वैदकीय संचालक संजय मुखर्जी,यांनी विशेष सहकार्य केले आहे.डॉ मंगेश देशमुख,डॉ विद्या अर्जुनवाड, डॉ यशवन्त कुलकर्णी आदींनी या कामी वैदकीय अधिष्ठाता डॉ संजयकुमार तांबे याना सहकार्य केले.