बारामती; हरभऱ्याला मिळणार 4875 रु हमीभाव - अनिल खलाटे
कोऱ्हाळे बु - शेतकऱ्यांनी काबाड कष्ट करून उत्पादीत केलेल्या हरभऱ्यालाही हमीभाव मिळणार असल्याची माहिती बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अनिल खलाटे व सचिव अरविंद जगताप यांनी दिली.
गेल्या चार वर्षात डाळी पिकांचे उत्पादन वाढल्याने व्यापारी हरभऱ्याला 3200 ते 3500 रु भाव देत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा खर्चही निघत नाही. शेतकऱ्यांच्या हरभऱ्याला हरभऱ्याला शासनाने हमी भावाने खरेदी करण्याचा प्रस्ताव मार्केट कमिटीने महाराष्ट्र राज्य मार्केट फेडरेशनकडे दिला होता.
सदर प्रस्ताव मंजूर झाल्याने मार्केट कमिटीकडूनहरभरा खरेदी केला जाणार आहे. त्याला 4875 रु हमीभाव दिला जाणार आहे. प्रत्येक शेतकऱ्यांचा हरभरा एकरी फक्त 3 क्विंटल खरेदी केला जाणार असून शेतकऱ्यांनी निरा कॅनॉल खरेदी विक्री संघात 7/12, आधार कार्ड, बँक पासबुक खात्याची झेरॉक्स प्रत देऊन अधिकृत नोंदणी करावी असे अवाहन अनिल खलाटे यांनी केले आहे.