-->
माळेगाव ; काल झालेल्या वायु गळतीत एकाचा मृत्यू

माळेगाव ; काल झालेल्या वायु गळतीत एकाचा मृत्यू

माळेगाव - बारामती तालुक्यातील माळेगाव साखर कारखान्यात शनिवार दि.२३ रोजी बारा कामगारांना अपघात झाला होता. यामधील कामगार शिवाजी भोसले याचा मध्यरात्री २:३० च्या दरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती कारखाना प्रशासनाने दिली.
       दरम्यान पुणे येथे उपचार घेत असलेले कामगार घनश्याम निंबाळकर याची प्रकृती देखील चिंताजनक असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी काल तातडीने दुर्घटनाग्रस्त कामगारांची विचारपूस केली होती. 
         काल बारामती तालुक्यातील माळेगाव साखर कारखान्यातील टाकीची सफाई करताना  मिथेल वायुची गळती होऊन १२ कामगार बेशद्ध पडल्याची घटना घडली आहे.
  काल सकाळी साडेनऊ वाजता ही घटना घडली, सर्वांची प्रकृती स्थिर होती मात्र रात्री या घटनेतील एका कामगाराचा मृत्यू झाला आहे.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article