-->
नगरसेवकांच्या कार्यास अंगणवाडी कर्मचार्‍यांचा हातभार

नगरसेवकांच्या कार्यास अंगणवाडी कर्मचार्‍यांचा हातभार

इंदापूर : आज जगावर ओढावलेले कोरोना महामारीच्या संकटात जवळपास सर्वच सामाजिक संस्थांनी मदतकार्याला सुरवात करून नागरिकांच्या मदतीला धाव घेतली आहे.



           याच परीस्थितीत इंदापूर शहरातील राधिका सेवा संस्था व नगरसेवक अनिकेत अरविंद वाघ यांच्या माध्यमातून इंदापूर शहरातील प्रभाग क्रमांक १ मधील नागरिकांची इन्फ्रारेड थार्मामिटरच्या  साहाय्याने शरिरातील तापमाणाची तपासणी करण्यात येत आहे अशा परिस्थितीत यांच्या कार्याला मदतीचा एक हात देण्याचे काम इंदापुर येथील अंगणवाडी शिक्षिका रुपाली शेलार व योजना वाघमारे यांनी केले.



             यावेळी, त्यांनी घरोघरी जाऊन शहरात राहणाऱ्या लहानांन पासून ते वृद्धांपर्यंतची तपासणी केली.

             आज इंदापुर तालुक्याची कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या सहा वर पोहचली असून अशा या संकटकाळात,कोरोना व्हायरसवर अद्याप कोणतीही लस उपलब्ध नसल्याने अशा काळात आपण व आपली रोगप्रतिकार शक्ती तंदुरुस्त असणे गरजेचे असल्याने,रोगप्रतिकार शक्ती वाढवणे हा एकमेव प्रतिबंधात्मक उपाय आहे.भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने कोरोना व्हायरस संक्रमणाच्या विरूद्ध प्रतिबंधात्मक औषध म्हणून अर्सेनिकम अल्बम ३० हे होमिओपॅथिक ने सुचवलेले औषध राधिका सेवा संस्था व कै.सुलोचना शामराव चौधरी स्मरणार्थ संयुक्त विद्यमानाने या औषधाचे मोफत वाटप प्रभाग क्रमांक १ मधील प्रत्येक घरी करण्यात येत आहे.व तसेच औषध कसे घ्यावे,औषध घेताना कोणते पथ्य पाळावे हे सुद्धा प्रत्येक घरोघरी सांगण्यात येत आहे.


Related Posts

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article