शदर पवार आणि जितेंद्र आव्हाड यांची बदनामी करणाऱ्यांवर गुन्हा दाखल
सोमेश्वरनगर - प्रतिनिधी तुषार धुमाळ
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या विषयी ट्विटर वरून बदनामी करणाऱ्यांवर वडगाव निंबाळकर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत ज्ञानेश्वर पोमाणे रा बाबूर्डी ता बारामती यांनी वडगाव निंबाळकर पोलिसांत तक्रार दाखल केली होती. यावरून वडगाव निंबाळकर पोलिसांनी 'उध्वस्त मा. मु. 100 फॉल्लो बॅक ट्वीटर अकाउंट धारक @ आय एम सुशील या इसमावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हा दाखल केलेल्या आरोपीने माजी खासदार शरद पवार आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या बाबत हेतू परस्पर समजात द्वेशाची भावना, शत्रुत्व निर्माण होण्याची शक्यता असणारी विधाने केली तसेच शांततेचा भंग घडवून आणण्याच्या उद्देशाने दोघांबाबाबत अपमानास्पद विधाने करून सार्वजनिक शांतता प्रयत्न केल्या बाबत तक्रार आल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पीएसआय साळुंके करत आहेत.