वडगांव पोलिसांचा मटका अड्ड्यावर छापा, निरा-बारामती वार्ता च्या बातमीचा इफेक्ट
कोऱ्हाळे बु|| - बारामती तालुक्यातील वडगांव पोलीस स्टेशन हद्दीतील सोमेश्वरनगर या ठिकाणी पोलिसांनी मटका अड्ड्यावर छापा टाकून आज एक जणाला ताब्यात घेतले.
निरा-बारामती वार्ता ने दोन दिवसांपूर्वी वडगांव पोलिस स्टेशन हद्दीत मटका व्यवसाय तेजीत सुरू असल्याची बातमी प्रसिद्ध केली होती. याचाच इफेक्ट आज या कारवाईच्या माध्यमातून पाहायला मिळताना दिसत आहे.
याबद्दलची संपूर्ण माहिती अशी की, विश्वास सर्जेराव गायकवाड रा. करंजे असे ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याच्याकडून रोख ६६० रुपये जप्त करण्यात आले आहेत. सोमेश्वरनगर येथील कारखाना रोडवर मटका सूरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन चे पोलीस उपनिरीक्षक सुभाष मुंढे, पोलीस हवालदार महेंद्र फणसे, पोलीस नाईक काशीनाथ नगराळे, अक्षय सिताप यांनी ही कारवाई केली. या कारवाईबद्दल जनतेतून पोलिसांचे कौतुक होत असून येणाऱ्या काळात अशाच प्रकारे कारवाईचा बडगा चालू राहील अशी अपेक्षा होत आहे.