सहकारी संस्थेच्या सचिवांनी केडरला धोका न देण्याचे आवाहन - विजय शिंदे
बारामती - पुणे जिल्ह्यातील सर्व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या सचिवांनी केडरला धोका न देण्याचे आवाहन पुणे जिल्हा देखरेख सहकारी संस्थेचे अध्यक्ष विजू शिंदे यांनी केले आहे.
महाराष्ट्र राज्यात सर्व सहकारी संस्थांसाठी एकच वैद्यनाथन समितीचा कायदा लागू झाल्याने पुणे जिल्हा देखरेख संस्थेने न्यायालयात धाव घेतल्याने राज्यात फक्त पुणे जिल्हा वगळता केडर बरखास्त झाले आहेत.
पुणे जिल्ह्यातील सर्व सचिवांना न्याय मिळण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात 400 ते 450 च्या वर सचिव कार्यरत आहेत. त्यांच्या पगारासाठी संस्थेकडून फक्त 14 महिन्याचा जॉए आकारला जातो. त्यातून त्यांना दरमहा जास्तीत जास्त 40 हजार च्या दरम्यान पगार, केवळ अजितदादा मुळे 80 ते 1.25 रुपये बोनस व बँक बक्षीसही दिले जाते. तसेच वय 60 वर्ष झाले तरी 2 वर्ष काम करण्याची मुदतवाढ दिली जाते. तरीही स्वार्थासाठी काही सचिव मंडळी संस्थेच्या विद्यमान संचालक मंडळाची दिशाभूल करून संस्था केडर मधून बाहेर काढत आहेत हे अत्यंत चुकीचे आहे. उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील सर्व सहकारी संस्था, बँका साखर कारखाने, दूध संघ, खरेदी विक्री संघ अतिशय चांगल्या चालल्या आहे.
बारामती तालुक्यातील 197 वि.का सोसायट्यापैकी 140 संस्था केडरला जॉइंट असल्याने सचिवांना मोठ्या प्रमाणात सहकार्य केले आहे व यापुढेही कोणाला कधीही वाऱ्यावर सोडणार नाही असे 10 वर्षांपूर्वी सांगितले आहे तरी काही जेष्ठ सचिव मंडळी स्वार्थासाठी वि.का संस्थेच्या संचालक मंडळाची दिशाभूल करून स्वार्थ साधत आहेत तरी सर्व सचिवांनी केडरच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून सहकार अधिकाधिक तेवत राहण्यासाठी धोका न देता मदत करण्याचे आवाहन विजू शिंदे यांनी केले आहे.