बारामतीकरांसाठी मोठी आनंदाची बातमी, कोरोनावर उपचार करणार राज्यातलं तालुका पातळीवरील पहिलं रुग्णालय बारामतीमध्ये
दोन दिवसात कोरोना टेस्टिंग लॅब व ICU उपलब्ध असणार शासकीय हॉस्पिटल नागरिकांना उपलब्ध होणार.
सर्व यंत्रणा सज्ज स्टाप नेमणूक करून रुग्ण सेवा सुरु होणार.
कोरोना व्हायरस ने जगात हाहाकार उडवला आहे. या व्हायरस शी दोन हात करताना रुग्णांवर उपचार करणे मोठे जिकरीचे झाले आहे. अशातच ग्रामीण भागात मिळणाऱ्या पेशंट ला उपचारासाठी शहरात न्यावे लागतं असल्याने रुग्ण संख्या वाढण्याचा धोका ही बळावत आहे. यावर उपाय म्हणून उपमुखमंत्री अजित पवार यांच्या कमालीच्या *इच्छाशक्तीने* महाराष्ट्रातील तालुका पातळीवरील कोरोना रुग्ण तपासणीची पहिली प्रयोगशाळा आणि ICU सेवा देणार हॉस्पिटल बारामती मध्ये तयार झाले आहे. बारामतीच्या मेडिकल कॉलेज मध्ये प्रयोग शाळा, आणि रुई ग्रामीण रुग्णालयात 8 बेड ICU आणि 16 जनरल बेड उपलब्ध झाले आहेत. प्रयोगशाळा -रुग्णालयाची सगळी कामे पूर्ण झाली असून स्टाप नेमण्याचे कामं दोन दिवसात पूर्ण होणार आहे. त्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची तपासणी आणि उपचार हे आता बारामतीत होणार आहेत.
असा ही एक फायदा
बारामती मध्ये गोरगरीब रुग्णांना महागडे उपचार परवडत नाहीत. ICU सारखी उपचार सेवा सरकारी दवाखान्यात उपलब्ध झाल्यामुळे गोरगरीब नागरिकांना याचा फायदा होईल.
मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय झाल्यानंतर जळगाव, नांदेड, कोल्हापूर सह बारामती मध्ये प्रयोगशाळा व कोविड 19 साठी हॉस्पिटल उभारणी ला मंजूरी देण्यात आली मात्र टेंडर, काढणे मंजुरी येणे अशा शासकीय निधी ला वेळ लागणार ही गोष्ट लक्षात येताचं अजित पवार यांनी अनेक उद्योजकांना देणगी ची मदत करण्याचे आवाहन करताचं अनेक उद्योजकांनी लाखो रुपयांची मदत केली.
स्थानिक खासगी डॉक्टर यांचा नियोजनात मोठा वाटा.
प्रयोगशाळा आणि ICU बेड चे व्यावस्थापन करण्यासाठी ऐनवेळी अनुभवी लोकांची कमतरता पडू लागतातच बारामती मधील डॉ. तांबे, सदानंद काळे, मनोज खोमणे या शासकीय डॉक्टर यांच्यासह खासगी सेवा देणारे हर्षवर्धन व्होरा, शशांक झळक,डॉ. मदने, व इतर डॉक्टर रात्रदिवस कामं करीत आहेत.
प्रशासन आणि लोकसेवक ही राबले.
प्रयोगशाळा आणि हॉस्पिटल उभारणीची मंजुरी मिळाल्यानंतर प्रांतअधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार विजय पाटील, बानप.मुख्यधिकारी, नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे जेष्ठ नगरसेवक किरण गुजर यांनी प्रचंड मेहनत घेतली.