-->
पुरंदर तालुक्यात कोरोनाचा शिरकाव, वीर मध्ये सापडला पहिला रुग्ण

पुरंदर तालुक्यात कोरोनाचा शिरकाव, वीर मध्ये सापडला पहिला रुग्ण

पुरंदर  : पुरंदर मधील वीर येथे  कोरोना पाॅजिटीव्ह रूग्ण  आढळून आला आहे.ही व्यक्ती मुंबईहून गावाकडे आली होती. वीर गावातील या व्यक्तीने खाजगी लॅब मध्ये  कोरोना टेस्ट केली होती. ती पाॅजिटीव्ह आली आहे.
वीर (ता.पुरंदर) येथे मुंबईहुन आलेल्या एका व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट पाॅजिटीव्ह आल्यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. तालुक्यात आत्तापर्यंत एकही कोरोना रूग्ण नव्हता . पुरंदरचे प्रशासन करीत असलेल्या कामामुळे व  लोकांनी घेतलेल्या खबरदारीमुळे कोरोना तालुक्याबाहेर होता.मुंबईहून गावाकडे येणा-या चाकरमान्यांमुळे आता तालुक्यात धोका वाढला आहे. त्यातच हे चाकरमानी शाळेत कोरोनटाईन होण्यास नकार देत आहेत. तर होमकॉरन्टाईन केल्यानंतरही कॉरन्टाईनचे पालन करीत नाहीत.


त्यामुळे आता ग्रामीण भागात कोरोनाचा धोका वाढला आहे. पुरंदर मध्ये यापूर्वी जेजुरी मध्ये कोरोना पाॅजिटीव्ह रूग्ण आढळून आला होता.त्यानेही खाजगी लॅबोरेटरीमध्ये चाचणी केली होती. मात्र त्यानंतर सरकारी चाचणी मध्ये तो रूग्ण निगेटीव्ह आला होता.यावेळी सुध्दा खाजगीतच चाचणी करण्यात आली आहे. आता या रूग्णाला   कोवीड केअर सेंटरमध्ये ठेवण्यात येणार आहे.यानंतर पुन्हा चाचणी करण्यात येणार असल्याची माहिती पुरंदरच्या तहसीलदार रूपाली सरनोबत यांनी  दिली आहे.


Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article