
बारामती : फरार आरोपींना मदत करणाऱ्या अकरा जणांवर गुन्हा दाखल
बारामती : बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यासह भिगवण पोलीस ठाण्यामध्ये विविध गुन्हे दाखल असणाऱ्या सराईत गुन्हेगारांना खाण्यापिण्याची सोय करून त्यांना राहण्यासाठी आश्रय दिल्याप्रकरणी बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यात अकरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती बारामती ठाण्याचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांनी दिली. या प्रकरणी पोलिसांनी वामन विठ्ठल दराडे ( रा. निरगुडे, ता. इंदापूर ), लक्ष्मण हनुमंत नरुटे ( रा. काझड, ता. इंदापूर ), विशाल बाळासोा घोळवे ( रा. निंबोडी, बारामती ), संजय, राजाराम वेदपाठक ( रा. श्रावण गल्ली, ता . बारामती ) , नाना विश्वंभर कांबळे ( रा , पतंगशहा , बारामती) , अक्षय अंकुश कोकरे ( रा. पणदरे, ता. बारामती ), जयदीप पोपट दराडे ( रा. अकोले, ता. इंदापूर ), सूरज संतोष दराडे ( रा. अकोले, ता. इंदापूर), नाथा मोहन दराडे ( रा. अकोले, ता. इंदापूर ), विजय खाडे ( रा. रूई , ता. बारामती ), हषोकेश गुलाब गावडे ( रा.गावडेवस्ती, मेडद, ता. बारामती ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. तसेच आठ जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बाळा ऊर्फ जगदीश पोपट दराडे ( रा, अकोले, ता. इंदापूर, सध्या रा. वंजारवाडी, ता. बारामती ), विजय बाळासाहेब गोफणे ( रा. बंजारवाडी, ता. बारामती ) हे गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होते. आरोपींच्या विरोधात भिगवण व बारामती येथील पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. हे माहिती असूनदेखील त्यांच्या नातेवाइकांसह मित्रांनी त्यांना अटक टाळण्यासाठी पैसे, जेवण, औषधे पुरवली. स्वत : च्या घरात व शेतात ठेवून त्यांना आश्रय दिला. कारवाई पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक जयंत जयंत मीना, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती प्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप, सहायक पोलीस निरीक्षक जीवन माने यांनी केली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार संदीप कारंडे करीत आहेत .