बारामती ; पोलिसांची माळेगाव येथे अवैद्य गावठी हातभट्टीवर कारवाई
Saturday, May 16, 2020
Edit
बारामती | माळेगावमध्ये अवैध दारुच्या भट्टीवर धाड टाकून पोलिसांनी कारवाई केलीय. बारामतीचे डीवायएसपी नारायण शिरगावकर यांनी स्वत: ही धाड टाकून कारवाई केलीय. तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत मौजे माळेगावात सोमा गव्हाणे नावाचा व्यक्ती हा मोठ्या प्रमाणात गावठी हातभट्टी दारू तयार करत असल्याची माहिती गोपनीय पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार डी. वाय.एस.पी. शिरगावकर यांनी बारामती तालुका पोलीस ठाणेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पोरे व स्टाफ यांच्यासमवेत सदर ठिकाणी जाऊन रेड केली असता सोमा गव्हाणे हा त्याचे घराचे मागे हातभट्टीत दारू तयार करीत असल्याचे आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत जवळपास 300 लिटर दारूचे दोन बॅरेल, तसेच दारु बनवण्यासाठी लागणारे रसायन, साहित्य, जप्त केले आहे.