बारामती मध्ये एका दिवशी तब्बल तीन कोटीची सोने खरेदी
बारामती प्रतिनिधी
बारामती तालुक्यात सोने खरेदीही उच्चांकी झालेली असून ती तब्बल तीन कोटी झाली असल्याचे बारामती सराफ अशोसीयनाचे अध्यक्ष यांनी सांगितले..ते बोलताना म्हणाले की. लॉगडाऊन च्या काळात ही उच्चांकी खरेदी झाली असून , यावर्षीचे अतिशय महत्त्वाचे मुहूर्ताचे असणारा पाडवा ,अक्षयतृतीया ,महत्वाचे समारंभ, लग्न सराई या दिवशी सोने खरेदीला शहरी भागासह ग्रामीण भागातील लोक मुखलतहोते आणि तो खरेदीचा पैसा तसाच ठेवल्याने बारामती आठवड्यात सराफी बाजार मंगळवार व शुक्रवार उघडल्यानंतर तो पैसा सुरक्षित गुंतवणूक म्हणून त्यांनी सोने त्य खरेदी केल्याचे स्पष्ट केले ,लॉगडाऊन काळात सध्या प्रवास खर्च ,उन्हाळी सुट्टी , परदेशी दौरे व फिरण्याचा खर्च लोकांचा पैसा वाचल्या कारणाने व सुरक्षित गुंतवणूक कुठे करावी म्हणून त्यांनी सोने खरेदीवर भर दिला आहे , आंतरराष्ट्रीय घडामोडींवर सोने यांचा भाव वडणार की कमी होणार असे ठरणार असला तरी आणि सध्या सोने भाव सध्याचा ४६ हजाराहून ज्यास्त असून सुद्धा लोकांनी सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने खरेदीला प्राधान्य दिले आहे ,बारामती तालुक्यात ग्रामीण भागात सुद्धा सराफी बाजारात चालू आहे वेळेचे बंधन ठेवून आणि सोशल डिस्टन्स पालन करत बारामती तालुक्यातील ग्रामीण भागात ठरलेल्या वेळेत सराफी बाजार चालू असून ग्रामीण भागातही सोने खरेदीला चागला प्रतिसाद मिळत आहे.