बारामती; मुर्टी येथील ११ पैकी ९ लोकांचे रिपोर्ट निगेटिव्ह, वडगाव, महिलेच्या संपर्कातील लोकांचा रिपोर्ट संध्याकाळ पर्यंत येणार
मुर्टी येथील कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कातील अकरा व्यक्तींपैकी नऊ व्यक्तीचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून दोन लोकांचे तपासणी रिपोर्ट येणे बाकी असल्याची माहिती बारामती आरोग्य विभागाने दिली.
बारामती तालुक्यातील मुर्टी येथील एक व्यक्ती कामानिमित्त मुंबई येथे राहत होती दि १२ रोजी ती व्यक्ती त्याच्या मुळगावी मुर्टी येथे कुटुंबासमवेत दाखल झाली मागील काही दिवसांपूर्वी त्यांना त्रास जाणवू लागल्यानंतर त्यांची दि १७ रोजी कोरोना चाचणी करण्यात आली. त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने त्याच्या संपर्कातील ११ लोकांची तपासणी करण्यात आली होती. त्यातील ९ लोकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. तर दोन लोकांचे रिपोर्ट येणे बाकी आहे. मुर्टी पाठोपाठ वडगाव निंबाळकर या ठिकाणी कोरोनाचा दुसरा पेशेंट सापडला होता. याव्यक्तीच्या संपर्कातील आलेल्या लोकांची तपासणी केली असून त्याचे रिपोर्ट आज संध्याकाळ पर्यंत मिळतील अशी माहिती बारामती तालुका आरोग्य अधिकारी डॉ मनोज खोमणे यांनी दिली.