माळेगावमध्ये गुरांच्या चाऱ्याला आग ; भावाने व पुतण्याने आग लावल्याचा संशय
माळेगाव कारखाना येथिल सतिश बबनराव तावरे यांच्या कडब्याच्या गंजीला आग लावल्याने सुमारे पन्नास हजार रुपये नुकसान झाले असुन सदर आग भावाने व पुतण्याने लावली असल्याचा संशय फिर्यादीत नमुद केला आहे.
सतिश बबनराव तावरे (वय-49 रा.कारखाना माळेगाव बु) हे आपल्या कुठुंबासह येथे राहतात. दि.25 मे रोजी रात्री 1.45 वा.कारखान्याचे वाॅचमन दर्शन लालबिगे व इतरांनी हाक मारुन गंजीला आग लागल्याचे सांगितले. मात्र घराच्या कड्या बाहेरुन लावल्याने बाहेर येता आले नाही.मुलगा विराज तावरे यांनी अखेर पाठीमागच्या दाराने येऊन कडी लावलेले दार उघडले.आम्ही सर्वांनी पाणी टाकून आग विझवण्याचा प्रयत्न केला.अखेर कारखान्याच्या अग्नीशमन दलाने हि आग विझवली.
या आगीत गाईसाठी आणलेल्या तिन हजार पेंड्या जळुन पन्नास हजार रुपये नुकसान झाले. शेतीच्या वादातून भाऊ अरुण बबनराव तावरे व पुतण्या संदिप अरुण तावरे यांनी आग लावल्याचा संशय फिर्यादीत नमुद केला आहे. सदर घटनेचा तपास पोलिस हवालदार आबा ताकवणे हे करीत आहेत.