बारामती ; रात्री दूध संघ वसाहतीत सापडलेला तरुण सकाळी निगेटिव्ह
बारामतीत पॉझिटिव्ह आलेल्या दूध संघ वसाहतीतील रुग्णाची दुसरी चाचणी मात्र निगेटिव्ह आली आहे. तो दिलासा असला तरी प्रत्यक्षात कोणताही प्रवास किंवा कोणताही थेट संपर्क नसताना कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्याने खुल्याने फिरत असलेल्या बारामतीकरांसाठी हा धडा आहे.
दुध संघ वसाहतीतील २९ वर्षीय तरुणाला कोरोनाची बाधा झाल्याचे प्रशासनाने मंगळवारी रात्री जाहीर केले होते. मात्र शनिवारी केलेल्या चाचणीचा अहवाल मंगळवारी आला. त्याचबरोबर मंगळवारी केलेल्या चाचणीचा अहवाल आज सकाळी मात्र निगेटिव्ह आलेला आहे.
यासंदर्भात तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी माहिती दिली. या तरुणाचा कोरोनाबाधितांच्या संपर्कात आल्याचा कोणताही प्रवास संदर्भ नसल्याने बारामतीकरांनी याची काळजी घेण्याची गरज आहे. शहरातील खासगी हॉस्पिटलने करवून घेतलेल्या चाचणीमध्ये काही जणांचे अहवाल निगेटिव्ह आले होते. मात्र याच तरुणाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. या तरुणास कोणतीही लक्षणे नव्हते. त्यामुळे त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने प्रशासनास धक्का बसला होता. अर्थात अहवाल येण्यास उशीर होत असल्याने प्रशासनाने त्याची मंगळवारी पुन्हा चाचणी केली. त्याचा अहवाल सकाळी निगेटिव्ह आली. त्यामुळे रात्री पॉझिटिव्ह आलेला तरुण आता निगेटिव्ह आहे. त्यामुळे एका अर्थाने तो बारामतीकरांसाठी दिलासाच आहे.
अर्थात ही एक बाजू झाली. मात्र लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर बारामतीकर ज्या उजळ माथ्याने व अगदी बिनदिक्कत सगळीकडे फिरत आहेत, अनेकजण काळजी घेत नाहीत, मास्कही लावत नाहीत त्यांच्यासाठी हा कोरोना रुग्ण एक मोठा धडा आहे. प्रशासनाने प्रयत्नाची शर्थ करीत व त्याला नागरिकांनीही तेवढीच समर्थपणे साथ देत कोरोना आजवर रोखलेला आहे. त्यामुळे या रोखलेल्या कोरोनाच्या आड लक्षणे नसलेले कॅरिअर शहरात असतील याची काळजी सर्वांनीच करण्याची गरज आहे.
सामाजिक कार्यकर्ता असलेल्या या तरुणाचा कोणताही प्रवास संदर्भ नाही, तसेच कोरोनाबाधितांच्या भागातही तो नव्हता. असे असताना त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने लक्षणे नसलेले कोरोना कॅरीअर बारामतीतही असू शकतात या शक्यतेला मात्र पुष्टी मिळाली आहे. अनेकांना हा तरुण एकाच दिवसात पॉझिटिव्ह व निगेटिव्ह आल्याचे वाटू शकेल, मात्र या चाचण्यांमध्ये तीन दिवसांचा कालावधी होता. खासगी हॉस्पिटलने चाचणी करवून घेतल्यानंतर त्याचा अहवाल विलंब होत असल्याने शासकीय चाचणी करण्यात आली. त्यामुळे एकापाठोपाठ चाचणी अहवाल आले, अर्थात तरीदेखील त्यामध्ये तीन दिवसांचा कालावधी त्यामध्ये असल्याने यामध्ये विचार करण्याची वेळ बारामतीकरांची आहे. अर्थात फक्त बारामतीकरच नाही, तर राज्यातील सर्वच ठिकाणच्या नॉनकोव्हिड भागाने याचा धडा घेण्याची गरज.