बारामतीत बोगस पत्रकारांचा सुळसुळाट, प्रशासनाने दखल घेण्याची गरज
बारामती : बारामतीत काही दैनिक , साप्ताहिक , इले.मिडीया व बेकायदेशीर यूट्युब चॅनेलचे प्रतिनिधी असल्याचे सांगून प्रशासनाला वेठीस धरण्याचे काम काही बोगस पत्रकार करीत आहेत या प्रकाराबाबत प्रशासनाने तातडीने दखल घेण्याची गरज आहे . बारामतीत काही स्वयंघोषित पत्रकारांचा सूळसूळाट सुरू आहे इले.मिडीया किंवा दैनिकांनी त्या वार्ताहर , प्रतिनिधीना बडतर्फ केले असुन सुद्धा ते बारामतीत पत्रकार म्हणून मिरवत आहेत . काही युट्युब चॅनेलचा प्रतिनिधी , वार्ताहर व माझाच युट्युब चॅनेल असल्याचा आव आणत आहेत.
१ मे २०२० रोजी मा.संचालक प्रशासन ) , माहिती व जनसंपर्क महासंचालनालय , मंत्रालय मुंबई यांच्या समवेत झालेल्या मिटींगमध्ये युट्युब चॅनल्स्ची कोणतीही नोंदणी होत नसल्याने ती अधिकृत समजण्यात नये असे स्पष्ट केलेले असताना सुद्धा सर्रासपणे युट्युब चॅनेलचे प्रतिनिधी म्हणून बारामतीत मिरवीत आहेत व समाजाला प्रशासनाला वेठीस धरण्याचे काम करीत आहेत . कित्येक दैनिकाचे वार्ताहर संबंधित दैनिकाचे कोणतेही अधिकृत पत्र नसताना (कार्यकाळ संपलेले) शासनाच्या कार्यालयात जावून स्वत : ची छाप टाकण्याचा प्रयत्न करीत असतात काही शासनाचे अधिकारी या स्वयंघोषित पत्रकारांना कंटाळले आहेत यामुळे पत्रकार संरक्षण कायद्याचा लाभ नक्की कोणाला द्यायचा हा प्रश्न ऐरणीवर येऊन ठेपला आहे दररोज एक पत्रकारांची संघटना उदयास आहे . यामध्ये असणारे सदस्य स्वत : चा छुपा धंदा लपविण्यासाठी यामध्ये सभासद झालेले आहेत तर : चा स्वार्थ साधण्यासाठी सभासद झालेले आहेत . काही दैनिक , इले.मिडीयाचे प्रतिनिधी दुसऱ्या पत्रकार व संपादकांना कमी लेखून आम्ही किती श्रेष्ठ असे प्रशासनाला दाखवीत आहेत . तसेच निवडणूक काळात बोगस पत्रकार उगवले जातात . बोगस ट्यूब चॅनेलचे पत्रकार हे मोठ्या संख्येने निर्माण झाले आहेत . यू ट्यूब चॅनेलसाठी बातम्या करताना खूप मोठ्या प्रमाणावर पैसे उकळण्यात येत असल्याची चर्चा आहे . यू ट्यूब चॅनेलच्या क्षेत्रात नव्याने आलेले काही पत्रकार प्रलोभनाशिवाय काम करतात अशा मंडळीची संख्या हाताच्या बोटावर मोजण्या एवढीच मर्यादित आहे.