बारामती ; जेष्ठ पत्रकार शहाजी शिंदे यांचे निधन
बारामती तालुक्यातील वाणेवाडी सोमेश्वरनगर येथील पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते शहाजी गुलाबराव शिंदे यांचे नुकतेच निधन झाले. ते ५४ वर्षाचे होते.
पुणे जिल्हा भ्रष्टाचार निर्मुलन समितीचे पुणे जिल्हाधक्ष्य होते. जेष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांनी त्यांच्या कार्याची दखल घेतली होती. जिल्हाध्यक्ष असताना त्यांनी पुणे जिल्ह्यातील १३ ही तालुक्यातुन मोटार सायकलवर प्रवास करून कार्यकर्ते चे संघटन केले होते. त्याच दरम्यान त्यांनी साप्ताहिक राळेगणसिद्धी काढून भ्रष्ट्राचार निर्मूलन सह विविध विषयांवर वार्तांकन करीत अनेक वर्षे पत्रकारितेत आपला ठसा उमटवला होता.
त्यानंतर त्यांनी साप्ताहिक शारदारत्न, साप्ताहिक ज्ञानरेष, साप्ताहिक सोमेश्वर प्राईड आदी सप्ताहिकातून संपादकांची भूमिका पार पाडत विविध घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. स्वतःचा मेडिकल व्यवसाय, स्वतःचे घर बागायत शेती असतानादेखील त्यांना समाजसेवेचा ध्यास शांत बसू देत नव्हता, त्यानी आपला व्यवसाय बंद करून वाणेवाडी येथे वृद्धाश्रम सुरू केला. त्याद्व्यारे जिल्ह्यातील अनेक अनाथ व वयोवृद्ध माता पित्याना आधार दिला. त्यांच्या साप्ताहिका द्वारे समाजातील विविध मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरवत होते. त्यांच्या निधनाने तालुक्यातील अनेक मान्यवरांनी त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले आहे.