कोऱ्हाळेत काल सापडलेल्या कोरोना रुग्णाच्या संपर्कातील 12 जणांची आज टेस्ट होणार
कोऱ्हाळे बु|| बारामती तालुक्यातील काल कोऱ्हाळे बु या ठिकाणी एका वयोवृद्ध जेष्ठांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याच्या संपर्कातील १२ जणांची कोरोना चाचणी आज होणार असून उर्वरित आठ जणांची चाचणी उद्या होणार असल्याची माहिती तालूका आरोग्य अधिकारी डॉ मनोज खोमणे यांनी दिली.
कोऱ्हाळे या ठिकाणी काल कोरोना पेशेंट सापडल्यानंतर कोऱ्हाळे हे गाव २८ दिवसांसाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच आरोग्य विभागाच्या वतीने कोऱ्हाळे बु गावातील प्रत्येक घराचा सर्व्हे केले जाणार असून १४ दिवस हा सर्व्ह चालणार आहे. तर गावातील खाजगी डॉक्टरांना दवाखान्यात येणाऱ्या प्रत्येक पेशेंट माहिती रोजच्या रोज २८ दिवस आरोग्य विभागाला कळवावी लागणार आहे. तसेच कोरोना पेशेंट च्या संपर्कातील ८ व्यक्ती पुण्याला गेले असून पुण्याच्या संबंधित विभागाला कळविण्यात आले असून पुण्याला गेलेल्या त्या आठ लोकांची चाचणी उद्या करण्यात येणार असल्याची माहिती डॉ खोमणे यांनी दिली.