बारामतीत कोरोनाचा पुन्हा शिरकाव, 29 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण
बारामती - बारामतीमध्ये आमराई परीसर येथील एका 29 वर्षीय महिलेची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.
सदरची व्यक्तीची खाजगी हॉस्पिटलमध्ये स्लॅब घेऊन चाचणी घेतली असता पॉझिटीव्ह आली आहे. त्यामुळे आमराई परिसरातील सुहासनगर घरकुल जयभिम स्तंभ ते सिध्दार्थनगर चौक ते सचिन काकडे किराणा दुकान ते दामोदरे रॉकेल दुकान ते धनंजय तेलंगे ते वसाहत चौक ते जयभिम स्तंभ सुहासनगर घरकुल चौक ही सीमा गृहीत धरुन प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व सेवा व वाहतुकीस बंदी घालण्यात येत आहे.तरी सर्व नगर परिषद बारामती येथील नागरिकांना आवाहान करण्यात येत आहे की आपण आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी लाॅकडॉऊन शिथिलतेचा गैरफायदा घेऊन कुठल्याही परिस्थितीमध्ये घराच्या बाहेर पडू नये. गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये. अत्यावश्यक व गरजेच्या कामासाठी बाहेर पडताना मास्कचा वापर करणे, सामाजिक अंतर ठेवणे व त्याने सॅनिटाझरचा वापर करणे अत्यंत गरजेचे आहे. प्रशासकीय यंत्रणेस सर्वे कामी व कायदा व सुव्यवस्था कामे सहकार्य करावे असे आवाहन प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी केले आहे.