राष्ट्रवादी पक्षाच्या २१ व्या वर्धापनदिनानिमित्त बारामती तालुक्यात ७०० बाटल्या रक्त संकलीत
कोऱ्हाळे बु- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 21 व्या वर्धापनदिनानिमित्त बारामती तालुक्यात चार ठिकाणी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात सुमारे 700 बाटल्यांचे रक्त संकलित झाले असल्याची माहिती तालुका अध्यक्ष संभाजी होळकर यांनी दिली. राज्यात कोरोना व्हायरसने थैमान घातल्याने कोणत्याही ब्लड बँकेत रक्ताचा तुटवडा जाणवू नये म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्त जिल्ह्यात पदाधिकाऱ्यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्याच्या सूचना दिल्या होत्या. बारामती तालुक्याला 500 बाटल्यांचे उद्दिष्ट असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, ब्लड बँक, सोमेश्वर कारखाना यांच्या संयुक्त विद्यमाने बारामती येथील शारदा प्रांगण, माळेगाव, सुपा व सोमेश्वर इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. चारही ठिकाणी कोरोनाचे सावट असताना 700 बाटल्यांचे रक्त संकलित झाले असल्याचे होळकर यांनी सांगितले.
संग्रहित छायाचित्र