-->
बारामती ; मास्कविना फिरणाऱ्या 53 जणांना दंड

बारामती ; मास्कविना फिरणाऱ्या 53 जणांना दंड

बारामती  : बारामती शहर कोरोनामुक्त झालेले असल्याने काहीही धोकाच उरला नाही, अशा भ्रमात राहून मास्कविना फिरणा-या 53 जणांना बारामती नगरपालिकेने दणका देत त्यांच्याकडून प्रत्येकी दोनशे रुपये दंडाची आकारणी केली. 


बारामती नगरपालिकेच्या कर्मचा-यांनी आज दिवसभरात शहर पोलिसांच्या मदतीने विविध ठिकाणी जोरदार कारवाई करत मास्कविना बिनधास्त फिरणा-यांकडून दंड वसूल केला. ही कारवाई या पुढेही सुरु राहणार असून, दुकानात नियमांचे पालन न करणा-यांवरही नगरपालिकेचे पथक कारवाई करणार असल्याची माहिती आरोग्य निरिक्षक राजेंद्र सोनवणे यांनी दिली. 


बारामतीत गेल्या काही दिवसात अपवादात्मक रुग्ण सोडल्यास कोरोनाचे रुग्ण नाहीत. त्यामुळे लोकांनी सोशल डिस्टन्सिंगचे तीन तेरा वाजवले आहेत. अनेक जण बिनधास्त मास्कविना दुचाकीवरुन गावभर हिंडताना दिसतात. अशा नागरिकांवर आता दंडात्मक कारवाईचा बडगा नगरपालिकेने उगारला आहे. 


कोरोनामुक्तीकडे बारामतीची वाटचाल झालेली असली, तरी ही परिस्थिती कायम ठेवण्यासाठी लोकांनी काळजी घेण्याची गरज असल्याने नगरपालिकेने नाईलाजाने हे पाऊल उचललेले आहे. वारंवार मास्कचा वापर करण्याचे आवाहन करूनही अनेक जण नियमांचे पालन करण्यास तयार नाहीत. त्यामुळे या पुढील काळात ही कारवाई कठोर करण्याचेही निर्देश प्रशासनाने दिले आहेत.  



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article