कोऱ्हाळे येथे सापडलेल्या 90 वर्षीय कोरोना संक्रमिताचा मृत्यू
Saturday, June 6, 2020
Edit
बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे बु॥ येथील दि २ रोजी कोरोना बाधित झालेल्या जेष्ठाचा मृत्यू काल रात्री झाला आहे.
कोऱ्हाळे बुद्रुक येथील एका जेष्ठ व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याच्या संपर्कातील १७ लोकांची तपासणी करण्यात आली होती, यामध्ये परवा त्याच्या पत्नीचा तर काल घरातील इतर दोन सदस्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते, कोऱ्हाळे येथील एकूण बधितांची संख्या ४ वर गेली होती, त्यातील काल पहिल्या बाधित जेष्ठाचा मृत्यू झाला आहे.
कोऱ्हाळे बु गावात पहिला कोरोना बाधित पेशेंट सापडल्यावर कोऱ्हाळे हे गाव २८ दिवसांसाठी बंद केले असून गावातील सर्व घरातील तपासणी सुरू केल्या आहेत.
संग्रहित छायाचित्र