कोऱ्हाळे बु येथील जेष्ठ व्यक्तीस कोरोनाची लागण
Tuesday, June 2, 2020
Edit
कोऱ्हाळे बु|| - बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे बुद्रूक येथील ९० वर्षाच्या ज्येष्ठ व्यक्तीस कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल आला. हा व्यक्ती कोठेही बाहेर गेल्याची नोंद नाही, मात्र या ज्येष्ठ नागरिकाचा मुलगा भाजीपाल्याची वाहतूक करतो. त्याच्या वाहनाचा प्रवास आजूबाजूला झाला असल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. आजच्या दोन रुग्णांमुळे बारामती तालुक्याच्या ग्रामीण भागात करोनाचा वाढता प्रभावही स्पष्ट झाला आहे.