-->
भ्रष्ट व चुकीचे वागणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना सरळ करणार - प्रशांत (नाना) सातव

भ्रष्ट व चुकीचे वागणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना सरळ करणार - प्रशांत (नाना) सातव

बारामती शहर पोलीस स्टेशनचे पी.आय. औदुंबर पाटील गेली एक वर्षापासून बारामी येथे कार्यरत आहेत . बारामतीच्या इतिहासात इतका भ्रष्ट व चारित्र्यहीन अधिकारी या पुर्वी कधीही बारामतीकरांनी बघितला नाही. त्याच्या या कालावधीमध्ये विनयभंग, खंडणी, सावकारकी, शासकीय कामात अडथळा आणला म्हणुन ३५३ तसेच ३०७ सारखे अनेक खोटे गुन्हे या महाशयांनी दाखल केले आहेत व वरील गंभीर अशा गुन्हयामध्ये तुमच्या कुटूंबियांना देखील अडकविण्याची धमकी देऊन तसेच तुम्हाला गुन्हयाच्या तपासात सहकार्य करून मारहाण करणार नाही म्हणुन पैसे उकळण्याचे काम अतिशय राजरोसपणे चालु आहे. या सर्व प्रकारामध्ये बारामती विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. नारायण शिरगांवकर, ए.पी.आय. सचिन शिंदे, पी.एस.आय. पद्मराज गंपले, पी.एस.आय. शेलार व पोलीस कर्मचारी पोपट नाळे यांचादेखील सहभाग आहे.


         वरील प्रकारच्या वेगवेगळ्या गुन्हयामध्ये पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील महिला भगिनींना तपासकामी रात्री - अपरात्री पोलीस स्टेशनला बोलावून तुम्हाला तुमच्या कुटुंबावरती दाखल झालेल्या गुन्ह्यामध्ये मदत करतो म्हणुन फुस लावूनजवळीक साधण्याचा प्रयत्न करून शारीरीक सुखाची मागणी करतो. याबाबत माझ्याकडे या महिला भगिनींनी लेखी, खरी शपथपत्र दिलेली आहेत. अशी शपथपत्र की ज्या भगिनींच्याकडे शारीरीक सुखाी मागणी केलेली आहे त्याच्या छायांकीत प्रति त्या भगिनींच्या लेखी निवेदनासोबत मा. अप्पर पोलीस अधिक्षक, बारामती विभाग यांच्याकडे पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांचेवरूध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल करून घेण्याबाबत तक्रारी देखील करण्यात आल्या आहेत. अशाच प्रकारची खरी शपथपत्रे आरोपींच्या नातेवाईकांनी लाखो रूपये दिल्याबाबत व खोटे गुन्हे दाखल केलेबाबत आमच्याकडे दिली आहेत. त्या - त्या शपथपत्रांच्या छायांकीत प्रती देखील आम्ही अप्पर पोलीस अधिक्षक सो., बारामती विभाग यांना सादर करणार आहोत.


        आपणा सर्वाना माहित आहे की, बारामती शहराची ओळख राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, औद्योगिक व शैक्षणिक नगरी म्हणुन संपुर्ण जगामध्ये नावलौकीक आहे या वरील सर्व प्ररणामध्ये माझ्या मनामध्ये कोणताही राजकीय हेतु किंवा वैयक्तीक स्वार्थ नसून बारामती शहराची प्रतिमा मलीन करण्याचे काम या विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. नारायण शिरगांवकर, बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील, ए.पी.आय. शिंदे, पी . एस.आय. पद्मराज गंपले, पी.एस.आय. श्री . शेलार व पोलीस कर्मचारी पोपट नाळे यांच्याकडून केले जात आहे.


       मी एक बारामतीचा सुपुत्र म्हणुन गेली अनेक वर्षापासून कोणतयाही जातीधर्माच्या व्यक्ती अथवा माताभगिनी यांच्यावर अन्याय होत असेल तर त्याच्या विरोधा आवाज उठवित आलो आहे. मी स्वतः एक माजी सहाय्यक विक्रीकर आयुक्त म्हणुन महाराष्ट्र शासनाच्या सेवेमध्ये २० वर्षाहून अधिक काम केले आहे. त्यामुळे या विषयामध्ये महाराष्ट्रातील तमाम पोलीस अधिकारी व कर्मचारी त्यामध्ये बारामती शहर व तालुकयामध्ये कर्तव्य बजावणारे अनेक अधिकारी व कर्मचारी यांच्याबद्दल माझ्या मनामध्ये अतोनात आदर आहे. त्यांची कोणत्याही प्रकारे मानहानी किंवा पोलीसांचे मनोधैर्य खचविण्याचा माझा उद्देश नसून बारामती शहरामध्ये जे भ्रष्ट व चारित्र्यहीन वर उल्लेख केलेले अधिकारीच्या पुरताच मर्यादीत आहे. वरील अधिकाऱ्यांच्या बाबत देखील माझ्या मनामध्ये कोणताही आकस व सुडबुध्दी नसन त्यांनी वेगवेगळ्या गुन्हयातील आरोपींच्या कडून लाखे रूपयांची माया गोळा केलेली आहे आणि त्याचबरोबर आपल्या बारामतीतील बऱ्याच माता भगिनींना बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी शारीरीक सुखाची मागणी करून त्यांच्या मनामध्ये लज्जा उत्पन्न होईल असे गैरवर्तन व विनयभंगासारखे अनेक प्रकरणांच्या तक्रारी माझ्याकडे आल्यामुळे मी त्यांना मदत करण्याच्या हेतुने त्यांचा मुलगा म्हणुन लहान किंवा मोठा भाऊ म्हणुन महाराष्ट्राचे आराध्य दैवित श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिकवणीप्रमाणे माता भगिनींचा सन्मान करण्याचा आदर्श आपल्याला घालुन दिलेला आहे आणि भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहीलेल्या घटनेनुसार त्यांना कायद्याने संरक्षण देखील दिलेले आहे. या महाराष्ट्राची ओळख संपुर्ण जगामध्ये संताचा महाराष्ट्र म्हणुन आहे आणि या संतांच्या भुमीमध्ये बारामती शहरामध्ये काम करणारे वरील सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी आपल्याच डोळ्यांदेखत आपल्याच माताभगिनींचा विनयभंग करत असतील तर रांजाच्या पाटलासारखा या औदुंबर पाटलाचा चौरंग केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही.


     पोलीस निरीक्षक औदुंबर पाटीलच्या विरोधात याअगोदर देखील मा. पोलीस अधिक्षक यांच्याकडे लेखी व तोंडी स्वरूपात भष्ट्राचार चारित्र्याबाबत तक्रारी यापैकीच काही माता भगिनींनी केलेल्या आहेत. तरीदेखील आजपर्यंत या भ्रष्ट व चारित्र्यहीन औदुंबर पाटील च्या विरोधात कोणतीही कारवाई झालेली दिसून येत नाही. याच औदुंबर पाटील चे बंधू श्री. ज्ञानेश्वर भालचंद्र पाटील हे मध्यप्रदेश मध्ये आय.ए.एस. असून ते देखील समलैगिंक प्रकरणी, भ्रष्टाचार, विनयभंग अशा एक ना अनेक गुन्हयांमध्ये सापडून सस्पेंड झालेले आहेत. श्री. औदुंबर पाटील पोलीस खात्यामध्ये दाखल झाल्यापासून ज्या - ज्या ठिकाणी कर्तव्य बजावत होते त्या - त्या ठिकाणची आम्ही माहिती घेतली असता त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या महिला अधिकारी व कर्मचारी यांनी केलेल्या विनयभंगाच्या केसेस ची त्या - त्या विभागात चौकशी चालु आहे.



   या सर्व प्रकारामध्ये सर्व अधिकाऱ्यांच्या कडून आपल्या पदाचा गैरवापर करून खोटे गुन्हे दाखल करण्याची तसेच जिवे मारण्याचाही धोका निर्माण होऊ शकतो आणि यदाकदाचित तसे झाल्यास वरील सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी जबाबदार असतील.


       त्याचप्रमाणे बारामती शहरातील काही राजकीय पदाधिकारी व त्यांचे सहकारी यांना अवाहन करतो की, आपल्या माता भगिनीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडविणाऱ्या तसेच बारामतीतील वडीलधाऱ्या व बंधूसमान असणाऱ्या निरपराध लोकांच्या वरती खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या त्याचप्रमाणे बारामती हशराचे सामाजिक शांतता भंग करणाऱ्या आपल्या माता भगिनी तसेच पोलीस दलाची जनमानसातील प्रमिा डागाळणाऱ्या व मलीन करणाऱ्या भ्रष्ट व चारित्र्यहीन अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्यापेक्षा आपल्या माता भगिनींची अब्रु वाचविण्यासाठी तसेच वडीलधारी व बंधुसमान असणाऱ्या नागरीकांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे रहा.


       या माध्यमातून बारामती शहर व परिसरातील तमाम वडीलधारी बंधू तसेच माता भगिनी यांना अवाहन करतो की, जर का अशा प्रकारची तुमची देखील फसवणुक होत असेल किंवा झाली असेल तर तुमच्या नावाची संपुर्णपणे गोपनियता पाळून मी तुमचा मुलगा म्हणुन किंवा लहान भाऊ म्हणुन मी तुम्हाला सदैव मदत करण्यासाठी तयार आहे. त्यासाठी माझ्यावर कोणतेही खोटे गुन्हे दाखल झाले तरी चालेली त्यास मी समर्थ आहे . मी याठिकाणी जाणीवपुर्वक नमूद करू ईच्छितो की, बारामती उपविभागीय पोललीस अधिकारी म्हणुन ज्ञानेश्वर फडते, किशोर जाधव, संजय शिंत्रे, बापु बांगर, डॉ. श्रीकांत परोपकारी तसेच बारामती शहराचे माजी पोलीस निरीक्षक श्री. ज्योतिबा सावंत, श्री. विलास वाघ, श्री. गणेश मोरे, श्री. सतिश पाटील, श्री. मानसिंग खोचे अशा एक ना अनेक पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी बारामती मध्ये कायदा व सुव्यवस्था व सामाजिक सलोखा राखून पोलीस दलाचे नाव देशभर केलेले आहे त्यामुळे या लोकांचा मला सार्थ अभिमान आहे.


     तरी आम्ही तमाम बारामतीकर मागणी करतो की, वरील सर्व भ्रष्ट व चारित्र्यहीन पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे विरूध्द कायदेशीर योगय त्या कलमांने गुन्हे दाखल करून ताबडतोब निलंबन करण्यात यावे. कारण ते जर या पदावर कार्यरत राहीले तर त्यांच्याकडून त्यांच्या विरूध्द असणाऱ्या तक्रारदारांचे पुरावे नष्ट करतील त्याचप्रमाणे फिर्यादी यांना धमकी व जीवे मारण्याची शक्यता आहे. जर का असा एखादा प्रकार कोणाच्या बाबतीतही घडला तर त्याची जबाबदारी सर्वस्वी वरील अधिकारी यांच्यावर राहील असे मा. सहाय्यक विक्रीकर आयुक्त प्रशांत ( नाना ) सातव यांनी प्रसिद्धीला दिलेल्या म्हटले आहे. 


Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article