
बारामती; देशी दारू विक्री प्रकरणी महिलेवर गुन्हा दाखल
वाघळवाडी (कन्नडवस्ती) ता बारामती येथे विनापरवाना देशी दारू विक्री प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिसांनी एका महिलेवर गुन्हा दाखल केला आहे.
ज्योती रणजित रावळकर रा.वाघळवाडी (कन्नडवस्ती) ता.बारामती जि.पुणे असे गुन्हा दाखल केलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत वडगाव निंबाळकर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर महिला वाघळवाडी गावचे हददीत निरा डावा कॅनलचे कडेला निलगिरीचे झाडाचे आडोश्सास आपले कब्जात बेकायदा बिगरपरवाना देशी दारू जवळ बाळगुन तिची आपले ओळखीचे लोकांना चोरुन विकी करीत आहे, अशी खात्रीशिर बातमी मिळाली आहे. असे सांगुन त्यांनी लागलीच दोन लायक पंचाना बोलावून घेवुन पंचाना मिळाले बातमीचा आशंय सांगुन त्यांना छापा टाकतेवेळी व पंचनामा करतेवेळी समक्ष हजर राहण्याची विनंती केल्याने पंचानी त्यास संमती दर्शवली.
सदर ठिकाणी एक महीला आपले पुढयात पांढरे रंगाचे प्लॅस्टीकची पिवशी घेवुन बसलेली दिसली बातमी प्रमाणे आमची खात्री झाल्याने तिला आमची चाहुल लागल्याने ती सदरचा माल जागीच टाकुन पळुन जावु लागली तिस ओळखुन ज्योती रावळकर थांब थांब असे आवाज दिला परंतु ती मागे वळुन पाहुन न थांबताच
काटवानाचा फायदा घेवुन पळुन गेली ती बसले ठिकाणची पंचासमक्ष पाहणी करता एक प्लॅस्टीकची पिवशी त्यामध्ये खालील वर्णनाचा गुन्हयाचा माल मिळुन आला छापा घातला ती दि १६ वेळ ०८/०० वा. ची होती.
१) ३९०/- रु देशी दारू सखु संत्रा टॅगो प्रीमीयम कंपनीच्या ९० मीली मापाच्या १५ सिलबंद बाटल्या प्रत्येकी २६ रू किमतीच्या
२) ३९०/- रु देशी दारू टॅगो पंच कंपनीच्या ९० मीली मापाच्या १५ सिलबंद बाटल्या
प्रत्येकी २६ रू किमतीच्या
७८० /- येणेप्रमाणे वरील वर्णनाचा व कीमतीचा प्रोव्हीशन गुन्हयाचा माल मिळुन आला तो पो हवालदार महेंद्र फणसे यांनी सोबतचे पंचासमक्ष पंचनामा करुन गुन्हयाचे पुरावेकामी जप्त करुन ताब्यात घेतला आहे.