बारामती तालुका झाला कोरोनामुक्त, कोऱ्हाळे येथील तीनही व्यक्तींचे रिपोर्ट निगेटिव्ह
कोऱ्हाळे - बारामती शहर करोनमक्त झाल्यानंतर ग्रामीण भागात करोनावर नियंत्रण मिळवण्यास प्रशासनास यश आले आहे. शहरानंतर बारामतीचा ग्रामीण भाग देखील करोनामुक्त झाला आहे. शहरात ६० तर ग्रामीण भागात १४ दिवसात एकही रुग्ण आढळून आला नाही. त्यामुळे बारामतीकरांना दिलासा मिळाला आहे. बारामती शहर करोनामुक्त झाल्यानंतर ग्रामीण भागात करोनाचा प्रादुर्भाव वाढला होता. ग्रामीण भागात माळेगाव येथे करोनाचा पहिला रुग्ण सापडला होता. त्यानंतर ग्रामीण भागातील करोना संक्रमिततांची संख्या वाढतगेली.
त्यातील माळेगाव व को-हाळे बुद्रुक येथील करोना संक्रमित रुग्णाचा मृत्यू झाला. लॉकडाऊन शितील झाल्यानंतर पुणे मुंबई येथूननागरिकांचे लोंढे बारामतीत दाखल झाले. त्यामुळे बारामतीच्या ग्रामीण भागातकरोनाचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला होता. प्रशासनाच्या सूचनांचे पालन करत सर्वांनी खबरदारी घेतल्याने कोरोनचा मोठा धोका सध्या तरी बारामतीच्या ग्रामीण भागात टळला आहे. गेले १४ दिवसात बारामतीच्या ग्रामीण भागात एकही करोना संक्रमित रुग्ण आढळून आला नाही.
को-हाळे बुद्रुक येथील तिघांवर रुई ग्रामीण रुग्णालय येथे उपचार सुरू होते. त्या तिघांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना आज दि (१५) रोजी घरी सोडण्यात आले त्यामुळे बारामती शहर व तालुका करोनामुक्त झाला आहे. भीलवाडा तसेच बारामती पॅटर्नची प्रभावी अंमलबजावणी
करून बारामती शहर करोनामक्त करण्यात आले. त्यानंतर ग्रामीण भागात देखील करोनावर नियंत्रण
मिळवण्यात प्रशासनाने यश मिळवले आहे.
बारामती शहर व तालुका करोनामुक्त झाले असले तरीदेखील पुणे जिल्हा व पुणे शहरात करोना बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्यापार्श्वभूमीवर बारामतीकर यांनादेखील योग्य ती खबरदारी घ्यावी लागणार आहे. लॉकडाऊन शिथिल केले असले तरीदेखील प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन नागरिकांनी करणे गरजेचे आहे. त्यामुळे अनावश्यक गर्दी टाळावी असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेआहे.
डॉ. मनोज खोमणे तालुका आरोग्य अधिकारी
बारामती शहरानंतर तालुका देखील करोना मुक्त झाला आहे. को-हाळे बुद्रुक येथील १४ दिवस उपचार घेत असलेल्या तीन करोनासंक्रमित रुग्णांचे चाचणी अहवालअहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना रुई ग्रामीण
रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे तालुक्यातील करोना संक्रमितांची संख्या शून्य झाले आहे.