-->
धक्कादायक! मुलगी झाली म्हणून संतापलेल्या बापाने आरोग्य कर्मचाऱ्याच्या डोक्यात घातला दगड

धक्कादायक! मुलगी झाली म्हणून संतापलेल्या बापाने आरोग्य कर्मचाऱ्याच्या डोक्यात घातला दगड

बारामती: मुलगी झाली म्हणून एका बापाने रुग्णालयातच आपल्या पत्नीला मारहाण केल्याची धक्कादायक घटना बारामतीत घडली आहे. त्याला अडवण्यास गेल्या सुरक्षारक्षकालाही त्याने मारहाण करत डोक्यात दगड मारून जखमी केले आहे. बारामतीतील डोर्लेवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसूतीसाठी अर्चना कृष्णा काळे ही महिला दाखल झाली होती तिला पहिला मुलगा आहे आणि दुसरी मुलगी झाली आहे.


आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांनी कृष्णा काळेला मुलगी झाल्याची गोड बातमी दिली. पण, आपल्याला मुलगी झाले याचा संताप कृष्णा काळेला झाला. त्यानंतर दारूच्या नशेत त्याने प्राथमिक आरोग्य केंद्रात धिंगाणा घातला. नवजात बाळाला जन्म दिलेल्या बायकोलाच मारहाण आणि शिवीगाळ केली आहे.


त्याच्या या कृत्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारीही संतप्त झाले. त्याला अटकाव करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी बाळू चव्हाण गेले असता त्यांना आरोपी कृष्णा काळे याने दगडाने मारहाण करीत गंभीर जखमी केले आहे. बाळू चव्हाण यांच्या डोळ्याला आणि डोक्याला गंभीर जखम झाली असून त्यांना पुढील उपचारासाठी बारामती येथील सिल्वर ज्युबली रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. आरोपी कृष्णा काळे याच्यावर बारामती शहर पोलीस ठाण्यात भा.द.वि. 353 333 504 506 अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article