राष्ट्रवादी पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्त सोमेश्वरनगर येथे रक्तदान शिबीर संपन्न
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्त सोमेश्वर सहकारी साखर कारखाना, सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ सोमेश्वरनगर आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पश्चिम विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार(दि.१५) रोजी आयोजित केलेल्या रक्तदान शिबीरात सुमारे २०२ रक्तदात्यांनी रक्तदान केले. सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाच्या डिप्लोमा महाविद्यालयात झालेल्या रक्तदान शिबीराचे उदघाटन पंचायत समितीच्या सभापती निता बारवकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष संभाजी होळकर, युवकचे अध्यक्ष राहुल वाबळे, दूध संघाचे अध्यक्ष संदीप जगताप, सोमेश्वरचे उपाध्यक्ष शैलेश रासकर, शिक्षण मंडळाचे सचिव भारत खोमणे, गौतम काकडे, कौस्तुभ चव्हाण, विक्रम भोसले, रमाकांत गायकवाड, सुनील भोसले, सोमेश्वरचे संचालक किशोर भोसले, नामदेव शिंगटे, विशाल गायकवाड, महेश काकडे, लालासाहेब माळशिकारे, बाळासाहेब काकडे, प्राचार्य एस. के.हजारे, प्राचार्य एस. पी. जगताप यांच्यासह शिक्षक, कामगार पदाधिकारी आणि परीसरातील युवक उपस्थित होते.
दरवर्षी पक्षाचा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा होतो मात्र कोरोनामुळे राज्यात रक्ताचा तुटवडा जाणवत आहे याचा विचार करून पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी या शिबीराचे आयोजन केले होते. बारामती तालुक्यात ठिकठिकाणी रक्तदान शिबीर भरविले जात असून हजारो लिटर रक्त यातून संकलित केले जात आहे. सोशल डिस्टंगसिंगचे नियम पाळून हे शिबीर पार पडले. रक्तदात्यांना सोमेश्वर कारखान्याच्या वतीने एक लिटर सॅनिटायझर, प्रत्येकी मास्कचे वाटप करण्यात आले. पुणे येथील पुना ब्लड बॅंकेने या रक्तदान शिबीरासाठी सहकार्य केले.