नाही म्हणता म्हणता कोरोनाने कोऱ्हाळेत प्रवेश केलाच
Tuesday, June 2, 2020
Edit
को-हाळे बु।: नाही म्हणता म्हणता अखेर कोऱ्हाळे गावात कोरोनाने प्रवेश केलाच. गावालगत एका ९० वर्षीय वृद्धाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झालंय. त्यामुळे आता गावातील कोरोना प्रतिबंधक उपाययोजना समितीने व पर्यायाने गावाने अधिक दक्ष राहायला हवे.
गावठाण, समतानगर, पेशवेवस्ती,चर्मकार वस्ती या ठिकाणी अनेक जण पुणे, मुंबई या ठिकाणाहून आले आहेत. वास्तविक बाहेर गावाहून आल्यानंतर त्या व्यक्तींना कडक क्वारंटाईन करणे गरजेचे असते. शेजारील कोऱ्हाळे खुर्द गावाने याबाबत खूप प्रभावी उपाययोजना आखल्या मात्र कोऱ्हाळे बुद्रुक मध्ये बाहेरून आलेल्या अनेक जणांना शाळेत संस्थात्मक क्वारंटाईन न करता घरीच राहण्याची मुभा दिली आहे. शिवाय ज्या कुटुंबात बाहेरून आलेले लोक आहेत त्यांनी स्वतःहून क्वारंनटाईन होणे गरजेचे असताना ते कुटुंबीय खुशाल गावात फिरत आहेत. त्यामुळे ग्रामस्थांना कोरोनाचा धोका वाढला आहे. घरी बाहेर गावावरून आलेले लोक असताना त्याच कुटुंबातील काही जण मात्र मोकाट फिरत आहेत. त्यांना जागरूक ग्रामस्थांनी जाब विचारला असता ते दुसऱ्यांकडे बोट दाखवतात. त्यामुळे आता गावातील कोरोना प्रतिबंधक उपाययोजना समितीने अधिक दक्ष व्हायला हवे. जे नियम मोडतात त्यांच्यावर कडक पोलीस कारवाई करण्याची सुरुवात आता या समितीने करायला हवी नाहीतर आता गावे कोरोनाची हॉटस्पॉट बनायला वेळ लागणार नाही.