बारामती तालुक्याच्या सीमेवर होमगार्ड जवानांचे काम कौतुकास्पद
को-हाळे बुद्रुक- देशात आणि राज्यात कोरोनाचा हाहाकार सुरू असताना काही कोरोना योध्ये मात्र आघाडीवर येऊन कोरोनाचा मुकाबला करत आहेत .यामध्ये डॉक्टर्स, आरोग्य विभागाचे कर्मचारी आहेतच मात्र पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून गृह रक्षक दलाचे अर्थात होमगार्ड चे जवान कैतुकास्पद काम करत आहेत .
सातारा व पुणे जिल्हा च्या सीमेवर सांगवी या गावात गृहरक्षक होमगार्ड दलातील जवान संदेश मोहन बनसोडे, व विजय महादेव आटोळे तैनात आहेत त्यांच्या मदतीला आरोग्य सेवक सचिन तात्याबा कांबळे व पोलीस मित्र अजित विनोद भोसले तसेच संदीप मिलींद आढाव आहेत .यांची पूर्ण टीम या अवघड काळात आपले काम चोख पणे पार पाडत आहे .सांगवी हे गाव सातारा व पुणे जिल्ह्याची तसेच बारामती व फलटण तालुक्यांची सीमा आहे .सोलापूर व सातारा जिल्ह्यात प्रवेश करण्या साठी सांगवी हे ठिकाण सोयीस्कार असल्याने या ठिकाणी वाहनांची मोठी वर्दळ असते त्या मुळे याटीम चे काम अधिक जोखमीचे आहे मात्र तरीही ही टीम जीवाची बाजी लावत येणार-या सर्व वाहनांचे योग्य पद्धतीने तपासणी करत आहेत .आनावक्षक प्रवेश करणा-या वाहना माघारी पाठवत आहे . त्यांच्या या कामाचे परिसरातून कैतुक होत आहे .