पत्रकारांना ५० लाखांचे विमा कवच
Thursday, June 4, 2020
Edit
बारामत : कोरोना काळात कर्तव्य बजावणाऱ्या पत्रकारांना ५० लाखांचं विमा कवच देण्यात येणार असल्याची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली. माध्यमांशी संवाद साधताना राजेश टोपे यांनी याबाबत माहिती दिली.
केवळ डॉक्टर आणि पोलीसचं नाही तर पत्रकारही कोरोना काळात कर्तव्य बजावत आहेत. दुर्देवानं जर कोणी कर्तव्य बजावताना बाधित झाले तर घाबरून जाण्याचं कारण नाही. तुम्ही बरे व्हालचं. दुर्देवानं कर्तव्य बजावताना एखाद्या पत्रकाराचा कोरोनामुळे मृत्यू झाला तर त्यालाही ५० लाखांचं विमा कवच असणार आहे. तो केवळ शासकीय कर्मचाऱ्यांपुरता नाही, असं टोपे म्हणाले. दरम्यान, कर्तव्य बजावत असताना मयत झाल्याची शिफारस जिल्हाधिकारी यांनी केल्यानंतर लाभ मिळणार आहे.