सांगवी; मद्यपींकडून दोघांना तलवार, पाईपने मारहाण करत ढाब्याची तोडफोड
बारामती : जेवण न दिल्याच्या कारणावरून सांगवी ( ता.बारामती ) येथील फलटण रस्त्यावरील विजय ढाब्यावर १५ ते १६ मद्यपींच्या टोळक्याकडून आचारी व वेटरला तलवार, गुप्ती, लोखंडी पाईप, कोयत्याने बेदम मारहाण करत सर्व वस्तूंची तोडफोड करून दोन ते तीन लाख रुपयांचे नुकसान करून १० हजार रूपये रोख रक्कम व एक मोबाईल लंपास केला आहे.
याबाबत फिर्यादी राहुल बाळासाहेब थोरात ( वय ३५ ) व्यवसाय-वेटर रा.शिरवली ता.बारामती यांनी आरोपी स्वप्निल रमेश निकम, सागर संभाजी निंबाळकर, अविनाश कैलास निंबाळकर, अभिजीत भानुदास निर्मळ, अक्षय भरत माने, लखन सावळाराम बरकडे, राज्यात राजेंद्र निंबाळकर, स्वप्निल रमेश निंबाळकर, माऊली बनकर पुर्ण नाव माहीत नाहीत, अक्षय जगताप पुर्ण नाव माहीत नाही, सोनू भोईटे पुर्ण नाव माहीत नाही, किशोर पांढरे पूर्ण नाव माहित नाही, रणजीत निंबाळकर पुर्ण नाव माहीत नाही, संग्राम मोहिते पूर्ण माहीत नाही, रोहित मोहिते पुर्ण नाव माहीत नाही सर्व.रा. राजाळे (ता. फलटण जि. सातारा ) यांच्या विरोधात बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिरवली गावच्या हद्दीत फलटण बारामती रोड वर असलेल्या हॉटेल विजय रेस्टॉरंट मध्ये आरोपी यांनी त्यांच्या ताब्यातील एक इंडिका कार व चार मोटारसायकल वरून आरोपी सागर निंबाळकर याच्या हातात तलवार व इतर सर्व जण लाकडी काठी घेऊन दहशत निर्माण करून अनधिकृतपणे हॉटेलमध्ये प्रवेश करून आरोपी सागर निंबाळकर व फिर्यादी यांचे मालक वरून तावरे यांच्यात झालेल्या बाचाबाची नंतर फिर्यादी तसेच हॉटेल मधील कुक दीपक शहा यांना दमदाटी करून काठ्या व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून हॉटेलमधील सर्व साहित्याची तोडफोड करून नुकसान केले. आरोपी सागर संभाजी निंबाळकर याने कुठे गेला आहे तुझा मालक त्याला व तुम्हाला जिवंत सोडणार नाही असे म्हणून त्याने दीपक शहा यांच्या डोक्यात त्यास ठार मारण्याच्या उद्देशाने मारहाण केली.
आचारी व वेटरला मारहाण करून जखमी करण्यात आले
त्याच दरम्यान पोलीस आले असता पोलिसांनी पाठलाग करून एकाला ताब्यात घेतला असून, इतर आरोपी फरार झाले आहेत. स्वप्नील निकम असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. घडलेला प्रकार असा की राजाळे (ता.फलटण ) येथील पाच ते सहा मद्यपी रविवारी (दि.१४) रोजी विजय ढाब्यावर रात्री १० वाजण्याच्या दरम्यान जेवणासाठी आले होते. यावेळी ढाबा मालक वरून तावरे यांना जेवणासाठी ऑर्डर दिली. यावेळी जेवणासाठी बंदी असून फक्त पार्सल चालू असल्याचे सांगण्यात आले. यावेळी मद्यपी यांनी इथेच जेवायला देण्याचा तगादा लावला. व वरून तावरे यांचे कचूरे धरले.
यावेळी त्यांच्यात बाचाबाची झाली. व गावातील लोकांनी समन्वय साधून हा वाद मिटवला होता. त्यानंतर मालक वरून तावरे हे आपल्या घरी गेले. त्यावेळी मद्यपी राजाळे ( ता.फलटण जि.सातारा ) येथील काही तरुणांना घेऊन ढाब्याची तोडफोड करण्यास सुरुवात केली. यावेळी तेथील आचारी व वेटर यांनी त्यांना रोखण्यासाठी गेले असता त्यांच्या डोक्यात लोखंडी पाईपने डोक्यात जबर मारहाण केली. त्यानंतर दोन फ्रीज, बसण्याची सर्व बाकडे, कौंटर फोडून त्यातील १० हजारांची रोख रक्कम लंपास केली.व किचन मधील गीरवी खाली ओतून देऊन भांडी देखील फेकून देण्यात आली. यावेळी १५ जणांच्या टोळक्याने वेटर व आचारी यांना लोखंडी पाईप, तलवारी, काठीने बेदम मारहाण करत असताना त्याच दरम्यान माळेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निखिल जाधव व होमगार्ड जवान हे सरकारी चार चाकी वाहनाने सांगवीकडे येत होते.
यावेळी होत असलेला प्रकार त्यांच्या लक्षात येताच क्षणी सरकारी चारचाकी वाहन सिने स्टाईलने ढाब्याच्या दिशेने घेतली असता मद्यपींच्या टोळक्याने लागलीच हातातील काठ्या, तलवारी, लोखंडी पाईप, गुप्ती जागीच फेकून देत शेतातून पळ काढला, त्याच दरम्यान पाठलाग करत एक जणाला पोलिसांनी ताब्यात घेतला. यामुळे पोलिसांच्या सतर्कतेमुळे पुढील गंभीर प्रकार थांबला गेला. याबाबत माळेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद पोरे हे अधिक तपास करीत आहेत.