-->
नियमबाह्य आडसाली ऊस लागवड करणाऱ्या सभासदांवर होणार कारवाई

नियमबाह्य आडसाली ऊस लागवड करणाऱ्या सभासदांवर होणार कारवाई

सोमेश्वर कारखान्याचे काही  सभासद नियमबाह्य आडसाली ऊस लागवड करत आहेत, अशा सभासदांवर दंडात्मक कारवाई करून त्यांच्या उसाच्या लागणीची नोंद  १५ दिवस उशिरा धरण्यात येईल, याबाबत नुकतेच कारखान्याने परिपत्रक काढले आहे. 
         यात कारखान्याने म्हंटले आहे की, आपले कारखान्याचा सन २०२०-२०२१ मधील आडसाली लागण हंगाम दि.०१-०७-२०२० पासून चालू होत आहे. तथापि असे निदर्शनास आले आहे की काही सभासद शेतकरी हे नियमबाह्य लागवड म्हणजेच ठरवून दिलेल्या तारखेपूर्वी लागण करीत आहेत, त्याबाबत कारखाना लागण परिपत्रक जा.क्र. ऊसविकास/परिपत्रक/ ४६९/२०२०-२०२१ दि.१३/०५/२०२० मधील मुद्दा क्रमांक २०(पृष्ठ क्र. २) नुसार दंडात्मक कार्यवाही द्वारे सदरील सभासदाची ऊस लागण नोंद १५ दिवस उशिरा धरली जाईल व त्या तारखेच्या प्रोग्रॅम नुसार ऊस तोड करणेत येईल.
     सदरची कार्यवाही ही दंडात्मक असलेमुळे त्यास व्हाराईटल बेनिफिट म्हणजेच को ८६०३२ व व्ही.एस.आय.९८०५ ह्या ऊस जातीसाठी असलेला ऊस तोड प्राधान्यक्रम न देता ती लागण कोएम ०२६५ ह्या जातीच्या प्रमाणे व वेळापत्रकानुसार तोडली जाईल. तरी सर्व ऊस उत्पादक सभासदांनी याची नोंद
घेऊन वेळेत आणि नियमाप्रमाणे ऊसलागण धोरण अवलंबावे.


संग्रहित छायाचित्र



 


Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article