बारामती तालुक्यात सापडला कोरोनाचा 27 वा रुग्ण
Wednesday, July 1, 2020
Edit
शहरातील भिगवण रस्त्यावरील जळोची भागातील एका आयटी अभियंत्याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे . बारामती तालुक्यातील हा २७ वा रुग्ण आहे . हा अभियंता लॉकडाऊनमुळे वर्क फ्रॉम होम काम करत होता . परंतु वैद्यकीय तपासणीच्या निमित्ताने तो दि . २१ जून रोजी पुण्याला गेला होता . तेथे किंवा प्रवासादरम्यान त्याला बाधा झाली असावी अशी शक्यता वर्तवली जात आहे . तेथून परतल्यानंतर त्याला लक्षणे जाणवू लागल्याने त्याने स्वतःहून रुई कोविड रुग्णालयात जात तपासणी करुन घेतली . तपासणीत तो पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले . दरम्यान तालुक्यातील हा २७ वा रुग्ण आहे . गेल्या काही दिवसांपासून बारामती शहर कोरोनामुक्त होते . या रुग्णामुळे कोरोनाचा पुन्हा शिरकाव झाला आहे .