सोमेश्वरनगर ; मास्क न वापरणाऱ्या नऊ जणांना दंड
वडगाव निंबाळकर पोलिसांनी आज सोमेश्वरनगर पारिसरात मास्क न वापरणाऱ्या नऊ जणांवर कारवाई करत ४ हजार ५०० रुपये दंड वसूल केला.
वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन व ग्रामपंचायत करंजेपुल ता.बारामती यांचे सयुक्त रित्या कोरोणा महामारीचे अनुषंगाने मास्क न वापरणारे लोकांवर कारवाई करण्यात आली असुन यापुढे मास्क न वापरता मिळुन येणारे लोकांनवर दंडात्मक कारवाईक करण्यात येणार आहे. प्रत्यकी इसमास ५००/- रू या प्रमाणे दंड आकरण्यात आला असुन एकुण ९ लोकांचेवर कारवाई करण्यात आली असुन त्यात एकुण ४५००/- रू दंड करण्यात आलाआहे. कारवाई दरम्यान करंजेपुल पोलीस टुरक्षेत्रचे पोलीस हवालदार महेंद्र फणसे,पोलीस नाईक सिताप, लोकरे गृह रक्षक दल तुषार सांळुखे ओंकार काळभोर, सौरभ थोपटे तसेच करंजेपुल गामपंचायत सरपंच वैभव गायकवाड,ग्रामसेवक आबासाहेब यादव,कर्मचारी श्रीकांत शेडकर,योगेश गायकवाड,सुर्यकांत गायकवाड उपस्थित होते.